Economic literacy : आर्थिक साक्षरतेसाठी NSE आणि Money B सोबत सरकारने केला त्रिपक्षीय करार

राज्यातील सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि गुंतवणूक कशी करावी? यासंदर्भात आर्थिक साक्षरता वाढावी, म्हणून राज्य सरकारने NSE आणि Money B सोबत त्रिपक्षीय करार केला आहे.

Update: 2023-06-15 02:43 GMT

राज्यातील सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि गुंतवणूक कशी करावी? यासंदर्भात आर्थिक साक्षरता वाढावी, म्हणून राज्य सरकारने आर्थिक साक्षरता वाढवणारा त्रिपक्षीय करार केला आहे.राज्यात वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी, शेअर बाजारातील गुंतवणूक कशी करावी? याबरबरच आर्थिक खबरदारी कशी घ्यावी? आणि सिक्युरिटी मार्केटबद्दल जागरुकता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी राज्य सरकारने त्रिपक्षीय करार केले आहेत.

राज्य सरकार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मनी बी यांच्यात सह्याद्री अतिथीगृह येथे त्रिपक्षीय करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रधान सचिव आणि मनी बीच्या संचालक शिवानी दाणी वखरे व NSE चे श्रीराम कृष्णन उपस्थित होते.

या त्रिपक्षीय कराराच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येणार हे. यासंदर्भात माहिती देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आर्थिक साक्षरता काळाची गरज आहे.य त्यामुळे या दृष्टीने लाखो लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. यामध्ये सायबर फसवणूकीपासून वाचणे, पाँझी योजनाबद्दल जागरुकता, गुंतवणूक कुठे व कशी करायची? या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने हा त्रिपक्षीय करार केल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.



Tags:    

Similar News