Fact Check: शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी खरंच माध्यमांना धमकी दिली का?

झी न्यूज, रिपब्लिक इंडिया, न्यूज 18 मध्यप्रदेश छत्तीसगड, न्यूज 18 राजस्थान, वन इंडिया न्यूज, रिपब्लिक, इकॉनॉमिक्स टाइम्स यांनी दाखवलेल्या वृत्ताची सत्यता काय?

Update: 2021-09-30 13:38 GMT

झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा 12 सेकंदांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात - "राकेश टिकैतचे पुढील लक्ष्य मीडिया हाऊस आहे. जर झी न्यूजने सत्य दाखवले तर ही धमकी? नाहीतर?"

दरम्यान, या व्हिडिओमध्ये, राकेश टिकैत असं म्हणताना ऐकू येत आहेत की, "पुढील लक्ष्य मीडिया हाऊस आहे. जर तुम्हाला टिकायचं असेल तर साथ द्या नाहीतर तुम्हीही जाल."

अलीकडेच, झी न्यूजने एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं. ज्यामध्ये नरेश टिकैत यांना ऊसाचे पीक एमएसपीपेक्षा कमी किंमतीत देण्यासंदर्भात वक्तव्य करताना दाखवलं होतं. दरम्यान, झी न्यूजने राकेश टिकैत यांचा हा व्हिडिओ शेअर करत दावा केला आहे की, "झी न्यूजने सत्य दाखवल्याने राकेश टिकैत चिडून असं म्हणत आहेत की, त्यांचं पुढील लक्ष्य मीडिया हाऊस आहे." मात्र, चॅनलने या व्हिडिओचा छोटासा भाग पुन्हा पुन्हा दाखवून या व्हिडिओला 'राकेश टिकैतची धमकी' असे लेबल लावले आहे.

रिपब्लिक इंडिया, न्यूज 18 मध्यप्रदेश छत्तीसगड, न्यूज 18 राजस्थान, वन इंडिया न्यूज, रिपब्लिक, इकॉनॉमिक्स टाइम्स अशी काही मुख्य नावे आहेत. यातील काही माध्यमांनी संपूर्ण व्हिडिओ दाखवला परंतु असा दावा देखील केला की टिकैत मीडिया हाऊसला धमकी देत आहेत.






 



 



 




 


दरम्यान, पत्रकार आदित्य राज कौल यांनीही राकेश टिकैत यांनी माध्यमांना जाहीरपणे धमकी दिल्याचा दावा केला आहे. एवढंच नव्हे तर, फेसबुक आणि ट्विटरवर देखील हा व्हिडीओ शेअर करताना अनेक लोक, राकेश टिकैतने मीडियाला जाहीरपणे धमकी दिल्याचा दावा केला आहे.




 


काय आहे सत्य...

राकेश टिकैत यांनी 28 सप्टेंबर ला माध्यमांशी संवाद साधला होता. या संभाषणादरम्यान ते म्हणाले होते,


 




 



"मुख्य तर दिल्लीची सरकार आहे, ज्यांनी कायदा करून अर्धा देश विकला आहे. त्यांच्याकडेही लक्ष द्या. मध्यप्रदेशातील मंडया विकल्या… 182 बाजारपेठा विकल्या. छत्तीसगडही दूर राहणार नाही. आता असे आहे की, सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आता पुढील लक्ष्य मीडिया हाऊस आहे. जर तुम्हाला वाचायचं असेल तर मला पाठिंबा द्या, अन्यथा तुम्हीही गेलात."

एकूणच, राकेश टिकैत यांच्या माध्यमांशी साधलेल्या संवादाचा एक छोटासा भाग घेऊन, त्यांनी मीडियाला धमकी दिल्याचा खोटा दावा केला जात आहे. कारण संपूर्ण व्हिडिओ पाहिला असता ते असं म्हणतांना दिसत आहेत की, "सरकारचे पुढील लक्ष्य मीडिया हाऊस आहे." दरम्यान, भारतीय किसान युनियनने हा संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. आणि म्हंटलं आहे की, आयटी सेलने हा व्हिडिओ एडिट केला आहे आणि टिकैत यांनी माध्यमांना धमकी दिली असं दाखवलं आहे.

दरम्यान, आम्ही राकेश टिकैत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आम्ही त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याशी बातचीत केली. ते म्हणाले की, राकेश टिकैत यांच्या बोलण्याचा अर्थ असा होता की,

"ज्याप्रमाणे शेती आणि शेतकऱ्यांवर सरकारने कब्जा केला आहे, त्याचप्रमाणे सरकारचे पुढील लक्ष्य मीडिया हाऊस आहे'. पेन आणि कॅमेऱ्यांवर बंदुकीने लक्ष ठेवलं जात आहे. मीडिया हे सरकारचे लक्ष्य आहे. सरकारचे लोक तुम्हाला बातमी देतील ती तुम्हाला लिहावी लागेल. त्यापेक्षा जास्त शब्द तुम्ही लिहू शकत नाही." ते म्हणाले की, हा व्हिडिओ एका दिवसापूर्वीचाच आहे, जो कट करून शेअर केला जात आहे.

दरम्यान, एएनआयने अगोदर, राकेश टिकैत यांच्या अपूर्ण विधानाचा व्हिडिओ ट्विट केला होता मात्र, नंतर चॅनलने संपूर्ण व्हिडिओ शेअर केला.

निष्कर्ष:

एकंदरीत राकेश टिकैत यांचा व्हिडीओ अर्धवट दाखवून खोटा दावा माध्यमं करत असल्याचं या वरून दिसून येते.

Fact Check: शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी खरंच माध्यमांना धमकी दिली का?

. https://www.altnews.in/media-misreported-that-rakesh-tikait-threatened-media-false-claim/

Tags:    

Similar News