Fact Check: मुलीला क्रूरपणे मारहाण करतानाचा हा व्हिडिओ नक्की कुठला आहे?

Update: 2021-07-09 02:00 GMT

सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅ्पवर मुलीला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. हा व्हिडिओ शेअर करताना असा दावा केला जात आहे की, पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांवर अत्याचार करत आहेत. काय आहे या व्हिडिओची सत्यता जाणून घ्या...






 काय आहे व्हायरल होणारा मॅसेज?

"बंगालची अवस्था पाहिल्यानंतरही आपले डोळे उघडत नाहीत, ममतांचे दलाल! टीएमसीवाल्यांनो कुत्र्यांसारखे मरतील... या मुलीचा एकच दोष आहे - ती दलित आहे आणि तिचा भाऊ भाजप कार्यकर्ता आहे. आता मीडिया कुठे आहे? " असा मेसेज व्हिडिओ व्हायरल करताना शेअर केला जात आहे.

काय आहे सत्य?

मुलीला मारहाण होणारे 3 व्हिडिओ एकाच घटनेशी संबंधित आहे. की-वर्डस सर्च केल्यानंतर काही बातम्या मिळाल्या. 2 जुलै 2021 दैनिक भास्करच्या रिपोर्ट नुसार




 


ही घटना मध्यप्रदेश मधल्या आलीराजपुर येथील फूटतालब गावातील आहे. या वृत्तानुसार, मुलीला मारहाण करणारे लोकं तिच्या कुटुंबातील आहे. मुलगी न विचारता आपल्या मामाच्या घरी गेल्यामुळे तिच्यावर रागावून कुटुंबियांनी तिला मारहाण केली आहे.

तसेच घटना जिल्हा कार्यालयापासून जवळपास 50 किमी लांब बोरी पोलीस स्टेशनच्या मोठ्या फुटतालाब गावातली आहे. गावात राहणारी नानसी (19) वडील केल सिंह यांनी तिचं लग्न जवळच्या भरछेवडी गावात लाऊन दिलं होतं. काही दिवसांपूर्वी नानसी चा नवरा कामासाठी तिला तिथं सोडून गुजरातला निघून गेला. या रागातून ती तिच्या सासरी न सांगता आपल्या मामाच्या गावी म्हणजे आंबी गावात निघून गेली. ही गोष्ट नानसीच्या माहेरी माहिती पडली. त्यामुळे ते नाराज झाले. त्यांना वाटलं की मुलगी घरातून पळून गेली. 28 जूनला तिला फुटतालाब घेऊन आल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता तिला बेदम मारहाण केली.

हिंदुस्तान टाइम्स च्या वृत्तानुसार, हे प्रकरण बोरी पोलीस स्टेशन मध्ये 1 जुलैच्या रात्री दाखल करून घेतले होते. आणि तिच्या भावांनी केलसिंह निनामा, कारण, निनामा, दिनेस निनामा आणि उद्य निनामा यांना आरोपी म्हणवून त्यांच्यावर आईपीसी कलम 355, 323, 294 आणि 506 च्या अंतर्गत कारवाई केली आहे. चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मुरादाबाद पोलीसांनी ही व्हिडिओ संदर्भात एक निवेदन जारी करून ही घटना मध्य प्रदेशची असल्याचे सांगितलं आहे.



आता चौथा व्हिडिओ काय सांगतो?



या व्हिडिओत तुम्ही ऐकू शकतात की, एक मुलगा मझोला पोलीसांनी कारवाई न केल्याची माहिती सांगतत आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओवर मुरादाबाद पोलिसांनी उत्तर दिलं होतं. मुरादाबाद पोलिसांच्या मते, ही घटना 13 जून ला झाली होती. या संदर्भात आरोपींना ही अटक करण्यात आली आहे.

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, माझौला पोलीस स्टेशन परिसरातील लोदीपूर जवाहर नगरमध्ये रविवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह मंदिराजवळ लटकलेला आढळला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसही तिथे पोहोचले होते. अहवालात असे सांगितले गेले आहे की, मृतांच्या सासऱ्यांनी तिची हुंड्यासाठी हत्या केली आणि मृतदेह गावाबाहेर बांधलेल्या मंदिराच्या जाळीमध्ये लटकवला. अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, मृत महिलेच्या माहेरच्या कुटुंबियांनीही आरोपींवर त्वरित कारवाई करण्यासाठी गदारोळ केला होता.

मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता, असेही या अहवालात सांगण्यात आले.

नेमकी घटना काय आहे? यासंदर्भात अल्ट न्यूजने माझौला पोलीस स्टेशनशी बातचीत केली. त्यांनी सांगितले की 1 जून 2021 रोजी सकाळी 7-8 च्या सुमारास रिंकीचा मृतदेह माझौला पोलीस चौकी, चामुंडा देवी मंदिराजवळ मिळाला होता

या प्रकरणी मुलीच्या कुटूंबियांनी माझौला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती की, त्यांची मुलगी रिंकी हिचा तिच्या सासऱ्यांनी हुंड्यासाठी छळ केला आणि त्यांनी रिंकीची हत्या केली. यासंदर्भात पोलिस स्टेशन माझौला येथे तक्रार दाखल केली आहे. व अन्य कायदेशीर कारवाई सुरू आहे.

निष्कर्ष:

एकूणच मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील दोन वेगवेगळ्या घटनांचे व्हिडिओ पश्चिम बंगाल असल्याचं सांगत व्हायरल केले जात आहे.

Tags:    

Similar News