Fact Check: केरळच्या मुस्लीमांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तोडल्याचा सोशल मीडियावरील दावा खरा की खोटा?

Update: 2021-08-15 12:00 GMT


सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे जातीय हिंसाचार उफाळू शकतो. परंतू हा व्हिडिओ तुमच्या पर्यंत आला असेल तर याची सत्यता जाणून घ्या. या व्हायरल व्हिडिओमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा काही लोक तोडत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ ट्विटर युजर जगत दारक हिंदू या अकांऊंटवरून शेअर करत... केरळमधले काही मुसलमान आंबेडकर यांचा पुतळा तलवारीने तोडत आहे. आता कुठे गेले जय भीम आणि जय मीम अशा घोषणा देणारे असा सवाल या युजर ने केला आहे.
  फ़ेसबुक वर अनेक लोकांनी हा व्हिडिओ शेअर केल्याचा दावा केला आहे.










 काय आहे सत्य?

या व्हिडिओची एक फ्रेम रिव्हर्स इमेजमध्ये सर्च केली असता ऑगस्ट 2019 मधल्या काही बातम्या मिळाल्या. हा व्हिडिओ तमिळनाडू मधला असून दोन गटांमध्ये झटापटी झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तोडण्यात आला? 26 ऑगस्ट 2019 ला द फ्री प्रेस जर्नल द्वारे अपलोड केलेल्या व्हिडिओ रिपोर्टमध्ये या व्हायरल व्हिडिओ काही दृश्य दिसली आहे. 



 


या अर्थ असा की 2 वर्षांपूर्वी तमिळनाडूमध्ये जातीय हिंसेदरम्यान काढलेला व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करून केरळच्या मुसलमानांवर निशाणा साधला जात आहे.
Tags:    

Similar News