Fact Check : मंदिरातील नंदी खरंच पाणी पितो आहे का?

Update: 2022-03-05 14:27 GMT

काही वर्षांपूर्वी गणपती पाणी पित असल्याची अफवा पसरली होती. आता पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे. नंदी पाणी पितो आहे अशा प्रकारचा चमत्कार घडत असल्याची अफवा राज्यात काही ठिकाणी घडल्याचे व्हिडिओ व्हायर झाले आहेत. वास्तकि पाहता चमत्कार कधीही घडत नसतात त्यामागे विज्ञान असते. पण विज्ञानाचे नियम, हातचलाखी, रसायनाचा वापर, सराव अशा गोष्टींच्या आधारे हे चमत्कार असल्याचे भासवले जाते.

त्यामुळे नंदी दूध पितो आहे ही सुद्धा अफवाच आहे, असे अंधश्रद्धा निर्मुलन समितीने म्हटले आहे. ह्या घटनेमागील शास्त्रीय कारण म्हणजे द्रवाचा पृष्ठीय तणाव किंवा इंग्रजीत ज्याला सरफेस टेन्शन म्हणतात तो आहे, अशा प्रकारच्या विज्ञानाच्या नियमांवर आधारित असलेली ही घटना आहे, त्यामुळे भाविकांनी आणि कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केले आहे. महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी प्रात्यक्षिक करून, भाविकांच्या अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.


Full View

Tags:    

Similar News