पंकजा मुंडेच्या दसरा मेळाव्यात स्वपक्षाबरोबरच विरोधकांना टोले

विरोधी पक्षातील प्रत्येक नेता उठतो आणि हे सरकार पडणार आहे असं सांगतो. आणि सत्ताधारी आमचं सरकार खंबीर आहे सांगतात. यातून तुम्ही बाहेर पडणार आहात की नाही? जनतेसाठी काय करणार आहात ते सांगा. विरोधी पक्षाने आणि सत्ताधारी आपापल्या भूमिकेकडे आणि जनतेच्या भल्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं भावनीक आवाहन करत सावरगावच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी स्वपक्षाबरोबरच विरोधकांना टोले लगावले

Update: 2021-10-15 10:52 GMT

``विरोधी पक्षातील प्रत्येक नेता उठतो आणि हे सरकार पडणार आहे असं सांगतो. आणि सत्ताधारी आमचं सरकार खंबीर आहे सांगतात. यातून तुम्ही बाहेर पडणार आहात की नाही? जनतेसाठी काय करणार आहात ते सांगा. विरोधी पक्षाने आणि सत्ताधारी आपापल्या भूमिकेकडे आणि जनतेच्या भल्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं भावनीक आवाहन करत सावरगावच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी स्वपक्षाबरोबरच विरोधकांना टोले लगावले``.

सालाबाद प्रमाणे सावरगाव येथील भगवान भक्तीगडावर आयोजीत दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. हेलिकॉप्टरनं भक्तीगडावर दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. याचाच संदर्भ घेत पंकजाताई म्हणाल्या,`` कोण्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी लोकं फुलं टाकत नव्हती. भगवानबाबांसाठी आणि तुमच्यासाठी वाहत होते . दसऱ्याची जी भक्ती आणि शक्तीची जी परंपरा आहे ती कायम ठेवण्यासाठी घऱची पुरणपोळी सोडून आले आहात सांगत पंकजा मुंडे यांनी राज्यातील विविध भागातून उपस्थितांचे संबधित भागाचे नाव घेत आभार व्यक्त केले. देशात असा सोहळा कुठे होत नसेल असं त्यांनी आवर्जून सांगितलं.

मेळाव्याला भक्तीगडावर दाखल होण्यापूर्वी पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर उड्डाण केल्यानंतर पुन्हा लँडिंग करण्यात आलं होतं. याबद्दल बोलताना त्यांनी मला वाटलं कोणाची दृष्टी लागली मेळाव्याला असा मिश्किल टोला लगावला. मला वाटलं मी येऊ शकणार नाही असं सांगत पंकजा मुंडे यांनी पण नंतर मी विचार केला तुम्ही मला कधीपर्यंत रोखणार कोण? असं म्हणत त्यांनी कविताच वाचून दाखवली. मी आता सत्तेत नाही त्यामुळं काही जणांनी यंदा मेळावा नको सांगितलं होतं. पण मी नकार दिला. कोणी म्हटलं अतिवृष्टी, कोरोना आहे. मी म्हटलं अशावेळीच तर लोकांना ऊर्जा देण्यासाठी मेळाव्याची गरज आहे सांगितलं मुंडेंनी स्पष्ट केलं.

"आपण जिथे जन्म घेतला त्या मातीचा, जातीचा आपल्याला कधी कमीपणा नाही वाटला पाहिजे अशी गोपीनाथ मुंडेंची शिकवण आहे. राजघराणं असो किंवा वंचितांमध्ये जन्म झालेला असो लाज वाटली नाही पाहिजे. आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्यासाठी ही परंपरा उभी केली आहे. कोणत्या पक्षाचं, मतांचं राजकारण नाही, तर सामान्यांची चळवळ येथून उठत आहे, जी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाते," असं पंकजा मुंडेंनी ठणकावून सांगितलं.

माझी सत्ता नाही पकंजाताई घरात बसलीय, असं म्हणणाऱ्यांवर टीका करता पंकजाताई म्हणाल्या, माझा दौरा लिहून घ्या. मी तीन दिवस दिल्ली, त्यानंतर मुंबई नवी मुंबई आणि नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहे. तेथून ऊसाच्या फडात जाऊन लोकांची संवाद साधणार आहे.लोकांना करोनामध्ये बेड, रेमडेसवीर औषधं मिळत नव्हती. त्यावेळी मी दौरे करायला हवे होते का? तुमची काळजी वाटली म्हणून दौरे नाही केले. पण घऱात बसून नव्हते…कोविड सेंटर सुरु केले होते. घरोघरी आम्ही डबे पोहोचवले, असंही मुंडे म्हणाल्या.

अतिवृष्टीत शेती शेतकऱ्याचं नुकसान झालं. आम्ही सरकारला दसऱ्याचा अल्टीमेटम दिला होता. सरकारनं पॅकेज जाहीर केलं. पण फक्त पॅकेज घोषीत करुन चालणार नाही. प्रत्येकाच्या हातात मदत गेली पाहीजे. येणारी दिवाळी गोड झाली पाहीजे. फक्त मोदींचे तेवढे पैसे येत आहेत. पण राज्य सरकारचे, पालकमंत्र्यांचे आले का? पण असं काही बोललं की यांना राग येतो. आता तुम्ही सत्तेत आहात तर तुम्हाला विचारणार ना…तुम्ही विरोधात होता तेव्हा तर धमक्या देत होतात अशा शब्दात पंकजा मुंडेंनी राज्य सरकारवर टीका केली.पुढे बोलताना त्या म्हणाल्या, उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे आपलं लक्ष लागलं आहे. ते जनहितार्थ घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. तीन पक्षांचं सरकार असून एकमेकांना खूश करण्यासाठी जनतेला का दुखी केलं जातयं, अशी टीका त्यांनी केली.

यावेळी पंकजा मुंडेंनी स्वपक्ष भाजपवरही टीका केली. विरोधी पक्षातील प्रत्येक नेता उठतो आणि हे सरकार पडणार आहे असं सांगतो. आणि सत्ताधारी आमचं सरकार खंबीर आहे सांगतात. यातून तुम्ही बाहेर पडणार आहात की नाही? जनतेसाठी काय करणार आहात ते सांगा. विरोधी पक्षाने आणि सत्ताधारी आपापल्या भूमिकेकडे आणि जनतेच्या भल्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.

महिला सुरक्षेवर बोलताना त्या म्हणाल्या, राज्यभर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिलांवर अत्याचार, बलात्कार होताहेत. महिलांकडे वाकडी नजर करुन जरी पाहिलं तर डोळे काढून घेणाऱ्याची ही भूमी आहे. हत्तीच्या पायाखाली दिलं पाहिजे. राज्यात काय चाललंय काय? त्यावर बोलायचं नाही…आरोपींवर बोलायचं नाही. सरकार जर असं काम करत असेल तर जाब विचारायचा की नाही?," असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केली.

ऊसतोड कामगार मंडळाचं काय झालं असं मला विचारतात. पण मला जसं हवं होतं आणि ज्या वेगाने हवं होतं तसं ऊसतोड कामगार मंडळ झालं नाही हे मान्य करते. पण आज नोंदणी सुरु झाली आहे. त्याची पायाभरणी आपण केली आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण सर्वांसाठी मी आवाज उठवणार आहे असं जाहीर करताना पंकजा मुंडे यांनी मराठा समाज-ओबीसी समाजात भांडण लावल्याचं कटकारस्थान रचलं जात आहे असा आरोप केला. दोन्ही मिळूनच बहुजन समाज आहे आहे सांगताना त्यांनी एकत्र आणून वज्रमूठ करण्याचा निर्णय घेतला असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

मराठा आरक्षण मिळेपर्यंत मी गळ्यात हार घालणार नाही असं जाहीर केलं आहे. ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत डोक्यावर फेटा घालणार नसल्याचं जाहीर केलं होतं. पंकजा मुंडेंनी यावेळी उपस्थितांना व्यसनाधीता सोडण्याचं आवाहन करत खिशातील तंबाकूच्या पुड्या फेकून द्यायला सांगितलं. 

Tags:    

Similar News