Fact Check: कोलकात्यात रोहिंग्या मुसलमानांनी हिंदूंची हत्या केली? काय आहे व्हायरल व्हिडीओचं सत्य

Update: 2021-07-16 07:39 GMT
स्क्रीनशॉर्ट झी प्रोग्रॅम 

सध्या झी न्यूजच्या प्राइम टाइम शो "DNA" च्या एका कार्यक्रमाची एक क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, "कोलकात्यामधील छोट्याशा गावातून हजारो हिंदू बेपत्ता आहेत आणि जवळपास ४५ हिंदू मारले गेले आहेत". दरम्यान पोस्टमध्ये या हल्ल्यासाठी रोहिंग्या मुस्लिमानांना जबाबदार ठरवलं असल्याचं सुद्धा नमूद केलं आहे.

कलकत्ता के एक छोटे गांव से एक हजार हिन्दू आदमी छोटे बच्चे तथा बड़े मिला कर गायब हो गए हैं 45 शव बरामद किए हैं रोहिंग्या मुसलमानों ने हिंदूओं का कत्ल कर दिया जी न्यूज की खबर सुने प्लीज रिट्वीट जरूर जरूर करें जिससे यह खबर शासन प्रशासन तक पहुंचे 🙏🙏 pic.twitter.com/j4lT4QHLPa

— Alpana Tomar 🚩🚩🏹kattar Hindu Wadi 🏹🚩🚩 (@alpana_tomar) July 11, 2021

कलकत्ता के एक छोटे गांव से एक हजार हिन्दू आदमी छोटे बच्चे तथा बड़े मिला कर गायब हो गए हैं 45 शव बरामद किए हैं रोहिंग्या मुसलमानों ने हिंदूओं का कत्ल कर दिया जी न्यूज की खबर सुने प्लीज रिट्वीट जरूर जरूर करें जिससे यह खबर शासन प्रशासन तक पहुंचे 🙏🙏 pic.twitter.com/UYWYUDZpHw

— Voice Of bengoli Hindu 🚩 (@VBengoli) July 12, 2021

हा व्हिडिओ ट्विटर सोबतच फेसबुक वरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


तसेच व्हायरल व्हिडिओसोबत आणखी एक हिंदी कॅप्शन लिहिलं गेलं आहे. ज्यात लिहिलं आहे की,

"कहीं पानी मिले तो डूब जाइए. यह उन हिंदुओं के लिए एक तमाचा है जो भाईचारे का नारा लगाते रहते हैं."

दरम्यान व्हिडिओ निरखून पहिला असता असं लक्षात येत की, व्हिडिओच्या सुरुवातीच्या २० सेकंदामध्ये अँकर सुधीर चौधरी म्हणतात की,

"आमच्या एका बातमीदाराने म्यानमारच्या राखिन येथील एका गावाला भेट दिली" म्हणजेच व्हिडिओमध्ये देण्यात आलेला रिपोर्ट हा म्यानमारमधील नरसंहाराबद्दल असून कोलकात्यातील गावाबद्दल नसल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान की वर्ड सर्च केल्यानंतर २०१७ ला झी न्यूजच्या यु ट्यूब चॅनलवर या व्हिडिओचा एपिसोड अपलोड झाल्याचं दिसून आलं.

Full View

रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, राखिनच्या उत्तर भागात ४५ हिंदू ग्रामस्थांचे मृतदेह सापडले. तसेच हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर या मृतदेहांचा शोध घेण्यात आला. ही माहिती हिंसाचारातून वाचलेल्या आणि बांगलादेशात आश्रय घेतलेल्या हिंदूंनी दिली असल्याचं रॉयटर्सच्या रिपोर्टमधून समजते.

सरकारच्या माहितीनुसार, ऑगस्ट २०१७ मध्ये जेव्हा रोहिंग्या मुस्लिम बंडखोरांनी ३० पोलिस चौक्यांवर आणि सैन्याच्या छावणीवर हल्ला केला होता. तेव्हा १२ जण ठार झाले होते. त्यानंतर, अरकान रोहिंग्या साल्व्हेशन आर्मी (एआरएसए) ARSA चे सुमारे १०० बंडखोर 'ये बाव क्या' नावाच्या हिंदू गावात पोहोचले, जिथे लोकांना त्यांच्या शेतातून पळवून नेऊन ठार मारून टाकण्यात आलं.


दरम्यान बांगलादेशातील रॉयटर्सच्या पत्रकारांनी गावातील हिंदू महिलांची मुलाखत घेतली असता, महिला म्हणाल्या की, त्यांच्या घरातील पुरुषांना राखिन बौद्धांनी ठार मारले. मात्र त्याच महिलांशी तीन स्त्रियांनी नंतर रॉयटर्सला सांगितले की, ज्या मुस्लिमानांनी त्यांना बांगलादेशात आणले होते. त्यांनीच त्यांना असे सांगण्यास सांगितले होते.

रॉयटर्सनुसार, काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, रोहिंग्या बंडखोरांना असा संशय होता की, हिंदू हे सरकारबरोबर आहेत आणि ते सरकारी हेर म्हणून काम करीत आहेत. दरम्यान २०१८ मध्ये, अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने अधिक तपशीलांसह एक रिपोर्ट केला होता. रिपोर्टमध्ये हा खुलासा करण्यात आला होता की, अराकान रोहिंग्या साल्व्हेशन आर्मी (एआरएसए) च्या सैनिकांनीच या हत्या केल्या होत्या.




 


राखीन प्रातांत बौद्ध आणि रोहिंग्या मुस्लिम यांच्यात झालेल्या हिंसाचारानंतर २०१२ मध्ये ASRA ची स्थापना झाली होती. दरम्यान माजी एमनेस्टी क्राइसिस रिस्पॉन्स डायरेक्टर तिराना हसन यांनी, "ASRA च्या भयंकर हल्ल्यानंतर म्यानमारच्या सैन्याने रोहिंग्या लोकांविरूद्ध मोहीम राबविली. यामध्ये दोघांचा सुद्धा निषेध करायला हवा. जर एका पक्षाने मानवी हक्कांचं उल्लंघन केलं असेल किंवा त्यांचा गैरवापर केला असेल तर दुसर्‍या पक्षानेही तीच वृत्ती बाळगावी. हे कोणत्याच प्रकारे योग्य नाही.

अशा प्रकारे, झी न्यूजचा २०१७ चा म्यानमारच्या राखीन राज्यात रोहिंग्या गटाने हिंदू ग्रामस्थांच्या हत्येविषयी केलेला एक रिपोर्ट कोलकात्यातील एका गावातील हिंदूंवर झालेल्या हिंसाचाराचा सांगत शेअर करण्यात आला आहे.


 



 



 


Tags:    

Similar News