Fact Check: ममता बॅनर्जी यांनी पोलिसांकडून नमाजासाठी मशिदीची साफसफाई करुन घेतली का?

Update: 2021-11-18 06:40 GMT

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये मुस्लिम समाजातील टोप्या घातलेले काही लोक उभे आहेत तर काही पोलिस त्यांच्यासमोर स्वच्छता करत आहेत. फोटोसोबत लिहिण्यात आलं आहे की, "तुम्ही कधी मंदिराची साफसफाई करताना पोलिसांना पाहिले आहे का..? नाही, ना..?

मात्र….ममता दीदींच्या बंगालमध्ये पोलीस नमाजसाठी मशिदीची साफसफाई करत आहेत.. पहा".

दरम्यान, हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत पश्चिम बंगालमधील पोलिसांनी मशिदीची साफसफाई केल्याचा दावा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर केला जात आहे. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

अक्षय नावाचा ट्विटर युजरने देखील याच दाव्यासह हा फोटो शेअर केला आहे.


अनेक फेसबुक ग्रुपमध्ये सुद्धा हा फोटो शेअर करण्यात आला आहे.






 



 



 



 


तसेच ट्विटरवर देखील अनेकांनी हा फोटो ट्विट केला आहे.




 



 



काय आहे सत्य...

रिव्हर्स इमेजमध्ये सर्च केले असता, 18 जून 2016 च्या फेसबूक पोस्टमध्ये ही इमेज सापडली. AK NEWS ने हा फोटो पोस्ट करत म्हटलं होतं की, भैंसा पोलिसांनी रमजानच्या निमित्ताने पंगेशा मरकजची स्वच्छता केली.




 


दरम्यान, फोटो बारकाईने पाहिला असता फोटोच्या उजव्या कोपर्‍यात 'SK TOYS' लिहिलेले आढळले. या दुकानाचे नाव गुगल सर्च केले तेव्हा भैंसा, तेलंगणा येथे 'SK TOYS' नावाचे दुकान असल्याचं आढळून आलं. तसेच, या दुकानाचा फलक व्हायरल फोटोत दिसत असलेल्या बोर्डाशी देखील जुळतो.

यासोबतच दुकानाजवळ पंगेशा मशीद असल्याचे गुगल मॅपवर सुद्धा दिसतं. त्यामुळे हा फोटो तेलंगणातील भैंसा येथील असल्याचं स्पष्ट होते.




 


दरम्यान, 'स्वच्छ तेलंगणा - स्वच्छ हैदराबाद' या फेसबुक पेजवर अनेक फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये पोलिस साफसफाई करतांना दिसत आहेत. 20 जून 2016 रोजी, तेलंगणा पोलिसांनी स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून मंदिर आणि मशिदीची स्वच्छता केली तसेच रोपेही लावली होती. या पोस्टमध्ये दिसणार्‍या एका फोटोमध्ये पोलीस मंदिराची स्वच्छता करतांना दिसत आहेत.

Full View

निष्कर्ष:

एकूणच, तेलंगणातील भैंसामध्ये पोलिसांनी स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून मशिदीची स्वच्छता केली. मात्र, या घटनेचे फोटो हे पश्चिम बंगालमधील असल्याचा खोटा दावा करत शेअर केले जात आहेत.

या संदर्भात Alt news ने फॅक्ट चेक केलं आहे. https://www.altnews.in/hindi/old-image-of-hyderabad-police-shared-with-false-claim-that-mamata-banarjee-making-clean-mosque-by-bengal-police/

Tags:    

Similar News