Fact check: KGF फिल्म स्टार यशने अयोध्या राम मंदीराला ५० कोटी दान केले?

KGF फिल्म स्टार यशने राम मंदिराला 50 कोटी रुपये दान केले आहेत का? जाणून घेण्यासाठी वाचा....

Update: 2022-08-30 03:10 GMT

केजीएफ KGF Movie Star यश संदर्भात एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेता यश ने खांद्यावर भगवी शाल घेतलेली आहे. कपाळावर टिळा लावल्याचं दिसत आहे. हा फोटो अयोद्धेचा असल्याचं सांगितलं जात असून यश ने अयोद्धेतील राम मंदिराला भेट दिल्याचा दावा या फोटोसोबत केला केला जात आहे. तसंच मंदिराच्या उभारणीसाठी यश ने ५० कोटींची मदत केल्याचा दावा या फोटोसोबत केला जात आहे.

राजीव श्रीवास्तव या युजर ने साउथचा अभिनेता पैसे देतो, असं म्हणत शाहरूख खानला देखील या दाव्यासोबत टार्गेट केलं आहे.

शिवम त्यागी यांनी देखील हाच दावा केला आहे.

उमा शंकर राजपूत ने देखील हाच दावा केला आहे.

एवढंच काय एका up tv samachar या युजर ने देखील हाच दावा केला आहे.

काय आहे सत्यता? (What is reality)

सोशल मीडियावर दावा केला जात असलेला फोटो आम्ही गुगल रिव्हर्स इमेज या टूलचा वापर करून सर्च केला असता आम्हाला ११ एप्रिलच्या Indian Express च्या बातमीत हा फोटो आढळला. या बातमीचं शिर्षक इंग्रजीमध्ये होते.

Yash visits Tirupathi ahead of KGF 2 release, see photos



फक्त Indian Express चं नाही तर India today ने देखील १२ एप्रिल ला या फोटोसोबत हेच वृत्त प्रसिद्ध केलं आहे.




 वरील दोनही बातम्यानुसार अभिनेता यश ने केजीएफ २ चित्रपट रिलीज होण्यापुर्वी आंध्र प्रदेशमधील तिरूपती मंदिरात जाऊन बालाजी चे दर्शन घेतल्याचं स्पष्ट होतं.

या संदर्भात युट्यूब वर एक व्हिडीओ देखील आहे. त्यामध्ये अभिनेता यश ने तिरूपती बालाजी चं दर्शन घेतल्याचं म्हटलं आहे.

Full View

निष्कर्ष :

वरील सर्व माध्यमांवरील बातम्या पाहता मॅक्समहाराष्ट्रची फॅक्ट चेक टीम या निष्कर्षावर पोहोचली आहे की, अभिनेता यश चे सदर फोटो हे तिरूपती बालाजीचे असून हे फोटो अयोद्धेचे सांगून त्या सोबत अभिनेता यश ने अयोद्धेतील राम मंदीराला ५० कोटी दान केल्याच्या दाव्यासह व्हायरल होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर केला जाणारा हा दावा खोटा आहे.

 

Tags:    

Similar News