Fact check – कश्मिरमध्ये घरात घुसून पोलीसांनी महिलांवर केला लाठीचार्ज ?

Update: 2019-08-30 04:19 GMT

काश्मिरमध्ये एका घरात घुसून पोलीस महिला आणि लहान मुलांवर लाठी चार्ज करतायत. महिला प्रतिकार करतायत तरी पोलीस थांबत नाहीत, ते घरात घुसून सामानाची उलथापालथ करतायत. विशेष म्हणजे पोलीस असं लिहिलेले टी-शर्ट या पोलीसांनी घातले आहेत, आणि धक्कादायक म्हणजे या पोलिसांच्या तोंडावर मास्क आहे, यांनी आपली तोंड झाकली आहेत. सध्या हा व्हिडीयो सगळीकडे व्हायरल आहे.

‘’आखिर यह कौन लोग हैं पुलिस अपना चेहरा ढक कर नहीं जाती तो फिर यह कौन लोग हैं जो महिलाओं के साथ ऐसा बर्ताव कर रहे हैं घर में जाकर क्या यही सब छुपाने के लिए कश्मीर को बंद किया गया है’’ अशा आशयाचा मेसेज लिहून त्या सोबत हा व्हिडीयो पोस्ट केला जात आहे.

[video data-width="214" data-height="400" mp4="http://maxmaharashtra.com/wp-content/uploads/2019/08/Fact-check-कश्मिर-लाठीचार्ज-Kashmir-video-news-marthi-maxmaharashtra.mp4"][/video]

मॅक्समहाराष्ट्र ने या व्हिडीयोची सत्यता पडताळून पाहिली. या व्हिडीयो मध्ये पोलीसांनी टी शर्ट वापरलेले आहेत. मात्र जम्मू-कश्मीर पोलिसांचा गणवेश खाकी रंगाचा आहे.

इंटरनेट वर सर्च केल्यानंतर या व्हिडीयोबाबत अधिक माहिती समोर आली. हा व्हिडीयो पाकिस्तानातील सिंध प्रांतातला आहे. सिंध पोलीस लोकांवर अत्याचार करतायत अशा आशयाच्या पोस्ट मे २०११९ मध्ये तिथे व्हायरल झाल्या होत्या. या पोस्ट फेक असून त्या तयार करणाऱ्यांना सिंध पोलिसांनी मे महिन्यातच अटक केली आहे. सिंध पोलिसांनी सोशल मिडीया आणि काही प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या अत्याचाराच्या बातम्यांचं खंडन करून हा व्हिडीयो बनावट असल्याचं सांगितलं आहे.

सिंध पोलिसांनी हा व्हिडीयो बनावट असल्याचं जाहीर केलं

हा व्हिडीयो फेक आहे. हा व्हिडीयो भारतातला नाही, पाकिस्तानमधल्या सिंध प्रातांतला आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईल वर असा व्हिडीयो आल्यास कुणालाही फॉरवर्ड करू नका. त्यांना या बातमीची लिंक पाठवा, जेणेकरून अशा पद्धतीने फेक व्हिडीयो शेअर करणाऱ्यांनाही आपली चूक समजून येईल.

तुमच्या मोबाईलवर जर काही मेसेज येत असतील, ज्याच्या सत्यतेबदद्ल तुम्हाला साशंकता असेल तर असे मेसेज आम्हाला पडताळणी साठी पाठवा.

Similar News