रोहित सरदानाचा शेवटचा व्हिडीओ मोदी सरकारला दोष देणार होता का?

Update: 2021-05-03 09:34 GMT

ज्येष्ठ पत्रकार आणि आज तक चे अँकर रोहित सरदाना यांचं 30 एप्रिल 2021 ला कोरानाने निधन झालं. या घटनेनंतर सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने रडत असलेल्या व्यक्तीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडीओ?

या व्हिडिओमध्ये कोरोनाच्या सध्याच्या भयानक स्थितीबद्दल सरकार आणि व्यवस्था कशा प्रकारे कारणीभूत आहे, या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. या व्हिडीओचे कॅप्शन रोहित सरदाना यांचा शेवटचा व्हिडिओ असं आहे. सध्या देशात हा व्हिडीओ देशात व्हाट्सअपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.



फेसबुक युजर मदन लाल नैन चौधरी यांनी सुद्धा रोहित सरदानाचा हा शेवटचा विडिओ आहे. असं म्हणत फेसबूक वर पोस्ट केली होती. त्याचबरोबर अनेक फेसबूक युजर्सने हा व्हिडिओ शेअर केल्याचं दिसून येत.

ट्विटरवर देखील हा विडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

निःशब्द, धक्कादायक…!!

भावपूर्ण श्रद्धांजली..!!

RIP ROHIT SARDANA

Last Word……. अशा प्रकारचे कॅप्शन देत हा विडिओ व्हायरल केला जात आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये बोलणारा व्यक्ती नक्की कोण आहे? ते रोहित सरदाना आहेत का? हा व्हिडिओ रोहित सरदाना यांचा शेवटचा व्हिडिओ आहे का?


काय आहे सत्य...

व्हिडिओमध्ये पिवळ्या रंगाचा लोगो दिसत आहे, ज्यावर 'दो बोल' अशी अक्षर लिहिलेली पाहायला मिळतात. युट्युब वर याबद्दल सर्च केले असता, हा व्हिडिओ 'दो बोल' या युट्युब चॅनेलवर २६-एप्रिल-२०२१ रोजी अपलोड केला होता. या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये हा व्हिडिओ पत्रकार नवीन कुमार यांचा असल्याचं म्हटलं आहे

Full View

याशिवाय हिंदी न्यूज पोर्टल "बोलता हिंदुस्थान" यांनीही 1 मे रोजी पत्रकार नवीन कुमारचा हा व्हिडिओ ट्विट केला आहे. पोस्ट मध्ये पत्रकार नवीन कुमार यांना टॅग सुद्धा करण्यात आलं आहे.





पत्रकार अभिसार शर्मा आणि रणविजय सिंह यांनी सुद्धा पत्रकार नवीन कुमार यांचा हा व्हिडिओ ट्विट केला आहे.

निष्कर्ष:


वरीस सर्व व्हिडीओ आणि पोस्ट पाहिल्यानंतर एक बाब स्पष्ट होते की, व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती ही रोहित सरदाना नसून पत्रकार नवीन कुमार असल्याचं स्पष्ट होते. एकंदरीत रोहित सरदानाच्या निधनानंतर पत्रकार नवीन कुमार कोविडशी झुंज देत असतानांच व्हिडिओ सोशल मीडियावर रोहित सरदानाच्या नावाने व्हायरल केला जात असल्याचं स्पष्ट झालं आहे.


Alt news ने याबाबात वृत्त दिलं आहे. https://www.altnews.in/hindi/emotional-video-of-journo-navin-kumar-shared-as-last-words-of-rohit-sardana/

Tags:    

Similar News