Fact Check: महात्मा गांधींनी खरंच सावरकरांना इंग्रजांची माफी मागण्यास सांगितले होते का?

Gandhi really to asked Savarkar to file mercy plea before British What is Rajnath Singh Statement Reality

Update: 2021-10-13 13:16 GMT

विनायक दामोधर सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली नव्हती. अशी भूमिका सातत्याने हिंदुत्व विचारसरणीच्या पक्षांनी घेतली आहे. खासकरून भाजप आणि शिवसेनेने. तर दुसरीकडे सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती. असा दावा सातत्याने कॉंग्रेससह अनेक बुद्धीजीवी लोक करत आहेत. तसे पुरावे देखील उपलब्ध आहेत.

मात्र, हिंदुत्ववादी पक्ष सावरकर माफीवीर नव्हते. अशी भूमिका सातत्याने घेत असताना देशाचे संरक्षण मंत्री आणि भाजप नेते राजनाथ सिंह यांनी ही बाब मान्य करत सावरकरांनी माफी मागितली होती. ही बाब मान्य करताना राजनाथ सिंह यांनी नवीन इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

तसं तर सावरकरांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. एक वर्ग सावरकरांना 'माफीवीर' म्हणतो तर दुसरीकडे आरएसएस आणि भाजप सावरकरांची मोठ्या प्रमाणात स्तुती करतात आणि त्यांना 'वीर' म्हणतात.

राजनाथ सिंह यांचा दावा काय?

महात्मा गांधींनी सावरकरांना ब्रिटिश सरकारसमोर दया याचिका दाखल करण्यास सांगितले होते आणि त्यानंतरच त्यांनी दया याचिका दाखल केली होती. महात्मा गांधी यांनी सावरकरांची सुटका करावी असं आवाहनही केले होतं.

असा दावा राजनाथ सिंह यांनी केला होता.

यावर मॅक्समहाराष्ट्रने ज्येष्ठ इतिहासकार लेखक प्राध्यापक राम पुनियानी यांच्याशी बातचीत केली. त्यांनी राजनाथ सिंह यांचा दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे. पाहा काय म्हणाले राम पुनियानी

Full View

Tags:    

Similar News