Fact check: राहुल गांधी यांनी निरज चोप्रा बाबत केलेल्या कथित ट्वीटची सत्यता काय?

Update: 2021-08-13 10:56 GMT

भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये खूप चांगली कामगिरी बजावली. भारताला एकूण 7 मेडल्स मिळाले आहेत. यामध्ये 7 ऑगस्ट ला भारतीय खेळाडू नीरज चोप्राने भालाफेक मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला आहे. यादरम्यान, राहुल गांधींच्या एक कथित ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या ट्विटमध्ये, "प्रथम आल्यानंतरही दुसऱ्या क्रमांकावर उभे राहणे योग्य आहे का? उत्तर द्या मोदी जी." असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्रा याचा फोटो शेअर करण्यात आला आहे. तर फोटोमध्ये नीरजच्या मागे आणि पुढे रिपब्लिक प्रजासत्ताकचे दोन खेळाडू आहेत. जे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. या कथित ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करताना राहुल गांधींची खिल्ली उडवली जात आहे.

ट्विटर हँडल 'नरेंद्र मोदी फॅन' वरून हा स्क्रीनशॉट ट्विट केला गेला आहे. तर या ट्विटला आतापर्यंत १.३ हजार लाईक्स आणि २०० हुन अधिकवेळा रिट्विट्स मिळाले आहेत.


ट्विटर युजर सोनिया चौधरी यांनी सुद्धा हा फोटो ट्विट केला आहे.



फेसबूकवरही हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.



काय आहे सत्य...?

या ट्विटच्या कथित स्क्रीनशॉटमध्ये, ट्विटची तारीख 5 ऑगस्ट आहे. आणि नीरज चोप्राने 7 ऑगस्ट ला भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्यामुळे हे स्पष्ट होतंय की, हे ट्विट बनावट आहे. दरम्यान, राहुल गांधी यांचे ट्विटर प्रोफाइल तपासले असता, 5 ऑगस्ट ला राहुल गांधी यांनी 3 ट्वीट केल्याचं पाहायला मिळालं. त्यातील पाहिलं ट्विट पहाटे 4:51 वाजता केलं आहे. ही तीच वेळ आहे जी व्हायरल होणाऱ्या ट्विटच्या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे. ट्विटमध्ये लिहिण्यात आलं आहे, "ग्रेट रवी दहिया ! कुस्तीमध्ये रौप्यपदक मिळवल्याबद्दल शुभेच्छा. या संदर्भात Alt news वृत्त दिलं आहे.




 

तसेच, व्हायरल ट्विटमधील मजकूर आणि प्रतिमा एकाच ओळीवर नाहीत. तर खऱ्या ट्विटमध्ये, मजकूर आणि प्रतिमा एकमेकांच्या खाली एकाच ओळीवर आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींमुळे हे स्पष्ट होतं की राहुल गांधी यांच्या नावे बनावट ट्विट तयार करून सोशल मीडियावर शेअर केलं जात आहे.


 


Tags:    

Similar News