Fact Check : ओवेसींनी हिंदूंना धमकावल्याचा व्हायरल व्हिडीओ खरा आहे का?

Update: 2021-12-29 02:30 GMT

17 ते 19 डिसेंबर दरम्यान हरिद्वार येथे धर्म संसद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्यांनी मुस्लिम धर्मियांविरोधात गरळ ओकली. धर्मसंसदेत बोलणाऱ्यांचे काही व्हिडीओ व्हायरल देखील झाले. यानंतर भाजपाच्या समर्थकांनी AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसींचा एक व्हिडीओ शेअर करायला सुरूवात केली. त्यात ओवेसी हिंदूंना धमकावत असल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान औवेसी यांनी ट्वीट करत म्हटले AIMIM च्या उत्तराखंड प्रदेशाध्यक्षांना धर्म संसदेच्या आयोजकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिल्याचे ट्विट केले होते.

धर्म संसदेत केलेल्या प्रक्षोभक भाषणांवरील लक्ष विचलित करून ओवेसींकडे वळवण्यासाठी एक छोटी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर दिल्ली भाजपाच्या प्रवक्ता अनुजा कपूर यांनी हा व्हिडिओ ट्विट करत म्हटले की, ओवेसी थेट हिंदूंना धमकी देत आहेत.

त्यानंतर भाजपा खासदार परवेश साहिब सिंह यांनीही हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. तर हा लेख लिहून पूर्ण होईपर्यंत हा व्हिडीओ 4 लाख लोकांनी पाहिला होता.

पुढे भाजपा समर्थक शेफाली वैद्य, महेश विक्रम हेगडे, @MrSinha_ , @MeghBulletin आणि स्तंभलेखक तहसिन पुनावाला यांनी हाच दावा शेअर करत ओवेसी हिंदूंना धमकावत असल्याचे म्हटले आहे.

तर स्तंभलेखक तहसिन पुनावाला यांच्या ट्व्टला शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी कोट करून ट्वीट केले.

पडताळणी 

सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, ओवेसी यांचे भाषण हरिद्वार येथे धर्मसंसद आयोजित करण्याच्या नंतरचे नाही. तर धर्म संसदेच्या पाच दिवस कानपूर येथे आधी केलेले वक्तव्य आहे. असदुद्दीन ओवैसी हे कथीत व्हायरल व्हिडीओत दावा केल्याप्रमाणे हिंदूंना नाहीत तर पोलिसांना आव्हान देत होते.

ओवेसी यांनी केलेले भाषण पूर्ण पाहिले तर 39 मिनिट 9 सेकंदाला व्हायरल व्हिडीओचा भाग सुरू होतो. त्यात असे म्हटले आहे की, "अभी शौकत साहब (AIMIM उत्तरप्रदेश अध्यक्ष) बता रहे थे की कानपुर तिहार रसूलाबाद में रसूलाबाद पुलिस स्टेशन में एक 80 साल के बुज़ुर्ग मोहम्मद रफ़ीक को पुलिस स्टेशन में इनकी दाढ़ी नोची गई और उन पर पेशाब किया गया. और ये हरकत करने वाले का नाम एसआई है, गजेंद्र पाल सिंह. बताइए आप, ये आपकी इज्ज़त है? अगर ये बात सच है तो शर्मिंदगी नहीं बल्कि तकलीफ़ होती है. हमारी दाढ़ी से तुमको नफ़रत क्यों है?"

पुढे ओवैसी म्हणतात की, "मैं तो उन पुलिस के लोगों से कहना चाह रहा हूं, याद रखो मेरी इस बात को…" व्हिडिओ पुढचा भाग तोच आहे जो व्हायरल झाला आहे. ओवेसी यांनी पोलिसांच्या क्रौर्याचा उल्लेख केला आहे, तेवढाच भाग कापून व्हायरल करण्यात आला आहे. "हमेशा योगी मुख्यमंत्री नहीं रहेगा, हमेशा मोदी प्रधानमंत्री नहीं रहेगा. और हम मुसलमान, वक्त के ऐतबार से खामोश ज़रूर हैं मग़र याद रखो हम तुम्हारे ज़ुर्म को भूलने वाले नहीं हैं. हम तुम्हारे ज़ुर्म को याद रखेंगे. अल्लाह अपने ताकत के ज़रिए तुमको निस्तो-नाबूद करेगा, इंशाअल्लाह. और हम याद रखेंगे, हालात बदलेंगे जब कौन बचाने आएगा तुमको, जब योगी अपने मठ में चले जाएंगे और मोदी पहाड़ों में चले जाएंगे, जब कौन आएगा? हम नहीं भूलेंगे, याद रखो."

Full View


त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कथित घटनेवर भाष्य करताना दुसऱ्या ठिकाणचा संदर्भ देत ओवेसींनी सांगितले की, "हम वो भी नहीं भूलेंगे की एक मुसलमान ऑटो रिक्शा ड्राईवर को एक दंगाई बजरंग दल जो भी थे, उसको मार रहे थे, वो बच्ची अपने बाप को बचाने की कोशिश कर रही थी. यही कानपुर में हुआ था न? हम याद रखेंगे. वो बच्ची उस बाप की बेटी ही नहीं मेरी बेटी है, मैं उसकी तकलीफ़ को नहीं भूलने दूंगा… टीवी पर दुनिया ने देखा कि एक बाप है, गोद में मासूम सा बच्चा है और पुलिस के थानेदार लट्ठ से मार रहे हैं, एक बाप कह रहा है बच्चे को लगेगी…"

मुस्लिमांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा दाखला देत ओवेसी म्हणाले, "अल्लाह तुम्हारा नाश करेगा / मिटा देगा". यामध्ये ओवेसी यांनी केलेली विधाने नक्कीच आक्षेपार्ह आणि चुकीचे आहे. मात्र ओवैसी यांनी हिंदूंच्या विरोधात भाष्य केल्याचा दावा चुकीचा आहे. तर असदुद्दीन ओवैसी यांच्या भाषणाची तुलना धर्म संसदेच्या कार्यक्रमात मुस्लिमांच्या नरसंहाराबाबत केलेल्या वक्तव्यांशी करणे चुकीचे आहे.

ओवैसींना ट्वीट करत म्हटले की, आपण पोलिसांच्या क्रौर्याचा उल्लेख केला आहे. "अल्लाह आरोपियों को सजा देता है."

त्यानंतर स्तंभलेखक तहसिन पुनावाला यांनी AIMIM प्रमुख ओवैसी यांच्यावर टीका करत पूर्ण व्हिडीओ शेअर केला होता.

निष्कर्ष  

अल्ट न्यूजने केलेल्या पडताळणीत असे समोर आले की, ओवैसी यांनी हिंदूंना धमकावल्याच्या व्हिडीओत तथ्य नाही. तर त्या व्हिडीओची क्लिप कट करून शेअर करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News