Fact Check : त्रिपुरात मुस्लिम विरोधी नारे दिल्याचा व्हिडीओ खरा आहे का?

Update: 2022-04-18 01:30 GMT

सध्या सोशल मीडियावर मुस्लिम विरोधी चिथावणीखोर घोषणा दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तर यामध्ये हिंदूंचा राग अनावर झाल्याचे म्हटले आहे. पण हा व्हिडीओ खरा आहे का? हे जाणून घेण्यासाठी वाचा...

सोशल मीडियावर मुस्लिम विरोधी घोषणा देत असल्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये हिंदूंना राग अनावर झाल्याचा दावा करत हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. तर हिरेन पांडे नावाच्या एका ट्वीटर वापरकर्त्याने अशाच प्रकारचा दावा करत हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हिरेन पांडे या ट्वीटर वापरकर्त्याने लिहीले आहे की, ‘त्रिपुरा में हिंदुओं का गुस्सा फूटा, रैली और नारे सुने | मुहम्मद तेरे बाप का नाम- जय श्रीराम जय श्रीराम , जाग उठा हिंदू जय श्रीराम’ अशा आशयाचे ट्वीट करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. (Archived link)

Full View

कुलदीप सिंह नावाच्या ट्वीटर वापरकर्त्यानेही अशाच प्रकारे आक्षेपार्ह घोषणा देत व्हिडीओ शेअर केला आहे. (Archived link)

0

ट्वीटर वापरकर्ते दिलीप कुमार, सन्नी, कमल सिंह यांनीही हा व्हिडीओ याच दाव्याने शेअर केला आहे. तसेच हा व्हिडीओ फेसबुकवरही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

0

पडताळणी :

अल्ट न्यूजने व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील एक फ्रेम रिव्हर्स इमेजमध्ये सर्च केली. त्यामध्ये पत्रकार मीर फैसल यांनी 26 ऑक्टोबर 2021 रोजी एक ट्वीट केलेला एक व्हिडीओ आढळून आला. ज्यामध्ये ज्यामध्ये हिंदू संघटनांनी त्रिपुरामध्ये काढलेल्या एका मिरवणूकीत मुस्लिम विरोधी घोषणा दिल्याचे म्हटले आहे. त्याबरोबरच मीर फैसल यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले होते की, गेल्या 12 मशिद आणि डझनभर मुस्लिम घरांना टार्गेट केले जात आहे.

Full View

पत्रकार अहमर खान यांनी 27 ऑक्टोबर 2021 रोजी व्हिडीओ शेअर करताना म्हटले की, त्रिपुरात एका मिरवणूकीदरम्यान मुस्लिम विरोधी घोषणा दिल्या गेल्या होत्या.

Full View

यानंतर आम्ही काही की वर्ड सर्च केल्यानंतर अल्ट न्यूजला हा व्हिडीओ नॉर्थ ईस्ट न्यूज पोर्टल न्यूज मुव्ह या युट्यूब चॅनलवर मिळाला. जो व्हिडीओ 27 ऑक्टोबर 2021 रोजी अपलोड केल्याचे आढळून आले. तर या व्हिडीओच्या डिस्क्रीप्शनमध्ये म्हटले आहे की, त्रिपुरामध्ये मशिदींमध्ये तोडफोड, दुकान आणि झोपड्यांमध्ये जाळपोळ यानंतर झालेले विरोध प्रदर्शन...

सदर व्हिडीओ मधील घटना उत्तर त्रिपुराच्या पानीसागर भागातील आहे. यावेळी बांग्लादेशात हिंदूंवर झालेल्या हल्ल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या मिरवणूकीदरम्यान जाळपोळ झाली. ज्यानंतर उत्तर जिल्हा मुख्यालय धर्मनगरमध्ये विरोध प्रदर्शन करण्यात आले. त्यावेळी धर्मनगरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले होते.

या घटनेसंदर्भात द वायरने केलेल्या रिपोर्टमध्ये 26 ऑक्टोबर 2021 रोजी त्रिपुराच्या पानीसागरमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या रॅलीवेळी मुस्लिमविरोधी उन्मादी घोषणा दिल्या होत्या. तर या मिरवणूकीदरम्यान काही दुकान आणि घरांवर हल्ला करण्यात आला होता. मात्र त्रिपुरा पोलिसांनी मशिदीमध्ये जाळपोळ केल्याची घटना अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र अल्ट न्यूजने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये पोलिसांचा दावा खोटा असल्याचे आढळून आले होते.

मात्र या सर्व बाबींचा विचार करता सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ जुना आहे. त्यामुळे अल्ट न्यूजच्या फॅक्ट चेकमध्ये करण्यात आलेल्या पडताळणीत सध्याच्या त्रिपुरातील घटनांशी या व्हिडीओचा काडीमात्र संबंध नसल्याचे म्हटले आहे.

Tags:    

Similar News