Fact Check : लव जिहादचा म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडीओ खरा आहे का?

Update: 2021-12-27 11:30 GMT

लव जिहादचा दावा करत असलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याक एक मुस्लिम मुलगा हिंदू मुलीला फसवून नेत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र या लव जिहादच्या दाव्यात तथ्य किती? वाचा Fact चेक व्हिडिओ

लव जिहादचा दावा करत एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक मुलगी रस्त्याच्या कडेला उभी आहे. काही वेळाने एक तरूण दुचाकीवर तेथे येतो. तेव्हा दोन तरूण रेकॉर्डिंग करत असतात. ते त्या तरुणाला पकडतात. हा व्हिडीओ शेअर करत म्हटले जात आहे की, मुस्लीम समाजाचा एक तरूण एका छोट्या मुलीला फसवून आपल्या सोबत घेऊन जात होता. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. तर हा व्हिडीओ पोस्ट करत अजय शुक्ला या फेसबुक वापरकर्त्याने हा व्हिडीओ लव जिहादचा असल्याचा दावा केला आहे. ही बातमी प्रसारीत होण्याच्या वेळेपर्यंत 26 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असल्याचे अल्ट न्यूजने म्हटले आहे.

Full View

फेसबुक युजर 'हिन्दू जय सेन'ने हा व्हिडीओ लव जिहादच्या दाव्यासह पोस्ट केला आहे.

Full View

अनेक फेसबुक आणि ट्वीटर वापरकर्त्यांनी हा व्हिडीओ याच दाव्याने शेअर केला आहे.




 





 


 


पडताळणी-

अल्ट न्यूजने केलेल्या फॅक्ट चेकनुसार अशा प्रकारचे व्हिडीओ बऱ्याचवेळी स्क्रिप्टेड असतात. ज्याची संहिता आधीच लिहीलेली असते. मात्र ते व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केले जातात. तर हे व्हिडीओ जागरूकता बनवण्यासाठी बनवले जातात. त्यावरून अल्ट न्यूजच्या टीमला हा व्हिडीओ स्क्रिप्टेड असल्याचा संशय आला. त्यानंतर अल्ट न्यूजने फेसबुकवर संबंधित कि-वर्डचा शोध घेतला. त्यावरून हा व्हिडीओ 21 डिसेंबर रोजी दीपीका शाहने पोस्ट केला होता.

Full View

या व्हिडीओत 5 मिनिट 38 व्या सेकंदाला संदेश देण्यात आला आहे. त्यामध्ये हा व्हिडीओ काल्पनिक असून हा जागरूकता पसरवण्यासाठी बनवला असल्याचे म्हटले आहे.

निष्कर्ष 




 


अल्ट न्यूजने दीपीका शाहच्या फेसबुक प्रोफाईलला भेट दिली असता तिथे दीपिका शाह अशा प्रकारचे स्क्रिप्टेड व्हिडीओ शेअर करत असल्याचे दिसत आहे. याशिवाय व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असलेली मुलगी ही दिपीका शाहच्या इतर व्हिडीओमध्येही दिसत आहे, त्यावरून सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ स्क्रिप्टेड असून केलेला दावा साफ खोटा असल्याचे पडताळणीत समोर आले आहे.(लिंक 1,लिंक 2) 


या संदर्भात alt news ने fact check केलं आहे.https://www.altnews.in/hindi/once-again-a-scripted-video-shared-to-target-muslims/ 

Tags:    

Similar News