Fact check : बिहारच्या ऋतुराज चौधरीने गुगल हॅक केले होते का?

बिहारच्या ऋतूराज चौधरीने गुगल हॅक केल्याबद्दल त्याला गुगलकडून 3 कोटी 66 लाख रुपयांची नोकरी मिळाल्याचा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याची सत्यता काय हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Update: 2022-02-09 04:30 GMT

बिहारच्या ऋतूराज चौधरीने गुगल हॅक केल्याबद्दल त्याला गुगलकडून 3 कोटी 66 लाख रुपयांची नोकरी मिळाल्याचा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये ऋतुराज चौधरी हा बिहारमधील बेगुसरायचा रहिवाशी असून त्याने 51 सेकंदासाठी गुगल हॅक केल्याचा दावा करण्यात येत आहे. तर त्याने गुगल हॅक केल्याबद्दल गुगलकडून ऋतुराज चौधरीला 3 कोटी 66 लाख रुपयांच्या पॅकेजसोबत जॉईनिंग लेटरही देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तर व्हायरल पोस्टमध्ये ऋतुराज चौधरी हा IIT मणिपुरचा दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असल्याचे म्हटले आहे. मात्र ऋतुराज चौधरीला गुगलने जॉईनिंग लेटर दिल्यानंतर त्याच्याकडे पासपोर्ट नसल्याने गुगलने भारत सरकारशी चर्चा करून 2 तासात त्याच्या पासपोर्टची व्यवस्था केल्याचा आणि आता तो खासगी विमानाने अमेरीकेला जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

याबाबत बिग बॉस टीव्ही शोचे कंटेस्टंट व गायक दीपक ठाकुर यांनी एक मोठी फेसबुक पोस्ट करून हा दावा केला होता. मात्र नंतर दीपक ठाकुर याने पोस्ट डिलीट करण्यात आली.




 


रायटर्स फाऊंडेशनचे संचालक अंकीत देव अर्पण यांनी लिहीले आहे की, रातो-रात एक बिहारी ने गुगल को हिला डाला, और लोग कहते है की हम लिट्टी चोखा से आगे नहीं आ पाए.




 


ट्वीटर वापरकर्ते हम लोग we the people यांनीही याच दाव्यासह ट्वीट केले आहे. याबरोबरच बिहार वाले, भुमिहार नावाच्या फेसबुक पेजवरुनही हाच दावा करण्यात आला आहे. तर या पोस्टला 9 हजार पेक्षा अधिक लाईक आणि 1 हजार पेक्षा जास्त वेळा शेअर करण्यात आले आहे. तसेच फेसबुक आणि ट्वीटरवर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे.

https://i0.wp.com/www.altnews.in/hindi/wp-content/uploads/sites/2/2022/02/word-image-2.jpeg?redata-size=552%2C813&ssl=1

पडताळणी –

या दाव्यातील सत्यता जाणून घेण्यासाठी अल्ट न्यूजने ऋतुराज चौधरीला संपर्क केला. त्यावेळी ऋतुराज चौधरी याने सांगितले की, गुगलच्या बग हंटर्स वेबसाईटवर एक बग रिपोर्ट झाला होता. ज्याचा ऋतुराज याला एक्सेप्टंस मेसेज आला होता. मात्र ऋतुराजने गुगल हॅके केल्याचा आणि गुगलने कोणतेही पॅकेज व जॉईनिंग लेटर दिल्याच्या दाव्यात काहीही तथ्य नाही. तर 2 तासात पासपोर्ट आणि खासगी विमानाने अमेरीकेला जाण्याबाबत काल्पनिक कथा व्हायरल होत असल्याचे म्हटले.

यावेळी ऋतुराजने हेही सांगितले की, IIT मणिपुरमध्ये शिकत असल्याचा दावही खोटा आहे. तर ऋतुराज चौधरी IIIT मणिपुरचा विद्यार्थी आहे. तसेच मणिपुरमध्ये IIT अशी कोणतीही संस्था अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे.

अल्ट न्यूजने गुगलच्या बग हंटर्स वेबसाईटवर ऋतूराजचे Honorable Mentions मध्ये ऋतुराजचे नाव सर्च केले होते. तर संशोधकांच्या लिस्टमध्ये ऋतुराज चौधरी नाव असल्याचे दिसून आले.

https://i0.wp.com/www.altnews.in/hindi/wp-content/uploads/sites/2/2022/02/word-image-16.jpeg?redata-size=1024%2C599&ssl=1

गुगलच्या बग हंटर्स वेबसाईटवर अल्ट न्यूजला 25 जानेवारी रोजी ऋतुराज चौधरीने रिपोर्ट सबमिट केल्याची माहिती दिली.

https://i0.wp.com/www.altnews.in/hindi/wp-content/uploads/sites/2/2022/02/word-image-17.jpeg?redata-size=1024%2C784&ssl=1

ऋतुराज चौधरीने न्यूज 18 बिहार झारखंड या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्याने IIT ची तयारी केली होती. मात्र त्यामध्ये त्याला अपयश आले. त्यामुळे त्याने IIIT (ट्रिपल आय टी मणिपुर) या ठिकाणी प्रवेश घेतला.

Full View

IIIT मणिपुर ( ट्रिपल आय टी) मणिपुर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप असलेली आणि सरकारी निधीवर चालणारे तंत्रशिक्षण संस्था आहे. मात्र IIT आणि IIIT या दोन्हीही ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी IIT JEE परीक्षा पास होणे आवश्यक असते. तसेच परीक्षेतील गुणतालिकेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. त्यामध्ये सर्वाधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना IIT मध्ये तर कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना IIIT व NIT मध्ये प्रवेश देण्यात येतो, अशी माहिती ऋतुराज याने अल्ट न्यूजला सांगितली. तर IIT म्हणजे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर IIIT म्हणजे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इनफर्मेशन टेक्नॉलॉजी असते. त्यापैकी IIIT ही माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या संबंधीत तांत्रिक शिक्षण संस्था आहे.

एबीपी न्यूज, झी बिहार झारखंड, न्यूज 24, न्यूज 18 बिहार झारखंड, ETV भारत बिहार यांनी आपल्या रिपोर्टमध्ये ऋतुराज हा IIT चा विद्यार्थी असल्याचा दावा केला आहे. टीव्ही9 भारतवर्ष, डीएनए, एबीपी न्यूज, एनडीटीव्ही, न्यूज 9, बीजीआर, बिहार एक्सप्रेस, कलिंगा टीव्ही यासह अनेक न्यूज पोर्टलने ऋतुराज चौधरी हा IIT मणिपुरचा विद्यार्थी असल्याचा दावा केला आहे.

https://i0.wp.com/www.altnews.in/hindi/wp-content/uploads/sites/2/2022/02/word-image-14.jpeg?redata-size=1024%2C571&ssl=1

https://i0.wp.com/www.altnews.in/hindi/wp-content/uploads/sites/2/2022/02/word-image-15.jpeg?redata-size=1024%2C576&ssl=1

DNA ने आपल्या फॅक्ट चेकच्या लेखातही ऋतुराज हा IIT मणिपुरचा विद्यार्थी असल्याचे म्हटले आहे.

निष्कर्ष –

वरील सर्व मुद्द्यांचा विचार केला तर ऋतुराज चौधरीने गुगल हॅक केल्याबद्दल त्याला गुगलने 3 कोटी 66 लाखांचे पॅकेज आणि जॉईनिंग लेटर दिले असल्याचा दावा खोटा आहे. तसेच ऋतुराज आयआयटी मणिपुरचा विद्यार्थी नाही. कारण मणिपुर येथे आयआयटी संस्था नाही. मात्र ऋतुराज हा मणिपुर येथील IIIT बीटेक कंम्प्युटर सायन्स इंजिनियरींगचा दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. 

Tags:    

Similar News