Fact check : उत्तर प्रदेशात सपा आणि भाजपने मतदारांना 500 रुपयांची पाकीटं वाटली का?

पाच राज्यांच्या निवडणुकांची सध्या धुम सुरू आहे. यामध्ये संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे ते उ. प्रदेशकडे...सर्वच पक्ष उत्तरप्रदेश जिंकण्याचा दावा करत आहे. याच दरम्यान प्रचार रंगात आलेला असताना उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि भाजपतर्फे मतदारांना पैसे वाटले जात असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Update: 2022-01-30 01:46 GMT

पाच राज्यांच्या निवडणुकांची सध्या धुम सुरू आहे. यामध्ये संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे ते उ. प्रदेशकडे...सर्वच पक्ष उत्तरप्रदेश जिंकण्याचा दावा करत आहे. याच दरम्यान प्रचार रंगात आलेला असताना उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि भाजपतर्फे मतदारांना पैसे वाटले जात असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये समाजवादी पक्षाचे चिन्ह असलेल्या पाकीटाचा फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 500 रुपयांची नोट दिसत आहे. भाजपचे उत्तर प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक शशी कुमार यांनी हा फोटो शेअर केला आहे. "ही आहे 'समाजवादी मत खरेदी योजना", असा टोला त्यांनी लगावला आहे.

हा फोटो CKMKB नावाच्या भाजप समर्थक फेसबुक पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. तर अल्ट न्यूजने पडताळणी करून लेख लिहिण्याच्या वेळेपर्यंत ही पोस्ट 24 हजारपेक्षा जास्तवेळा शेअर करण्यात आली होती.

Full View

काही लोक या फोटोचे आणखी एक व्हर्जन शेअर करत आहेत. या दुसऱ्या प्रकारच्या फोटोत पाकीटाच्या खाली डाव्या बाजूला उत्तर प्रदेशातील मेरठचे उमेदवार अतुल प्रधान यांचे नाव लिहीले आहे. याबरोबरच पत्राच्या पाकीटावर 'मिशन 2022' असे लिहीले आहे.

https://i0.wp.com/www.altnews.in/hindi/wp-content/uploads/sites/2/2022/01/index-2.jpg?w=587&ssl=1

समाजवादी पार्टीचे चिन्ह असलेला हा फोटो फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे असाच आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. त्या पोस्टमध्ये भाजपाचे चिन्ह असलेल्या पाकीटात 500 रुपये वाटले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

https://i0.wp.com/www.altnews.in/hindi/wp-content/uploads/sites/2/2022/01/sp-and-bjp-min.jpg?redata-size=768%2C426&ssl=1

हा फोटो ट्वीटरवरसुध्दा शेअर करण्यात आला आहे.

पडताळणी :

रिव्हर्स इमेजमध्ये सर्च केल्यानंतर अल्ट न्यूजला हा फोटो 2017 च्या पोस्टमध्ये आढळून आला आहे. तर फोटोच्या खाली अतुल प्रधान यांचे नाव असल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे अतुल प्रधान यांचे नाव एडिट करून या फोटोत टाकण्यात आले आहे.

या ट्वीटमध्ये पाकीटाच्या पुढच्या बाजूचा फोटोही शेअर करण्यात आला आहे. त्यात समाजवादी पक्षाच्या गोरखपूरमधील नेत्यांचे फोटो आहेत आणि त्यांची नावंही आहेत. तर पाकीटावर सपाचे माजी आमदार विजय बहादुर यादव आणि माजी मंत्री राम भुआल निषाद यांचा फोटो आहे.

2017 मध्ये गोरखपुर ग्रामीण निवडणूक क्षेत्रातून समाजवादी पक्षाचे उमेदवार असलेल्या विजय बहादूर यादव यांच्याशी अल्ट न्यूजने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, "जर लोकांना आमिष देण्यामध्ये आपला हात होता. तर गेल्या पाच वर्षात या प्रकरणाची चौकशी का झाली नाही? असे म्हणत या लज्जास्पद कृतीमागे भाजपचा हात असल्याचा आरोप विजय बहादुर यादव यांनी केला. पुढे विजय बहादूर यादव म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपासून उत्तर प्रदेशात भाजप सत्तेवर आहे. ते माझी चौकशी करू शकत होते." याबरोबरच यादव म्हणाले की, पाकीटावर दिसत असलेला त्यांचा फोटो 15 वर्षांपुर्वीचा आहे.

अल्ट न्यूजने शोध घेतला असता या पाकीटाबाबत अधिक माहिती मिळाली नाही. मात्र हा फोटो सध्याच्या उत्तर प्रदेश निवडणूकीशी संबंधित नाही. तर हा फोटो 2017 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. याबरोबरच समाजवादी पक्ष आणि भाजपला टार्गेट करण्यासाठी एकाच पाकीटाचा एडिटेड फोटो शेअर केला जात आहे.

https://www.altnews.in/hindi/old-image-used-to-falsely-claim-sp-bjp-bribing-voters-ahead-of-2022-up-polls/

Tags:    

Similar News