Factcheck : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरंच विनोदी भाषण केले का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांचे भाषण विनोदी असल्याचे दिसते आहे. पण प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमात एवढे विनोदी भाषण केले आहे का, याचा शोध मॅक्स महाराष्ट्रने घेतला आहे.

Update: 2022-07-12 11:00 GMT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका भाषणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये लोगो कोणत्या चॅनेलचा आहे ते स्पष्ट होत नाहीये.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?

या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे यांनी सुरूवातीलाच केंद्रीय मंत्री निर्मला सीताराम असे म्हटले आहे. एक मिनिट २ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री कधी मराठीत तर कधी हिंदीमध्ये बोलताना खूप अडखळत असल्याचे दिसते आहे.काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी हा व्हिडिओ "हंसना मना है हमारे मुख्यमंत्री" हैं असे म्हणत ट्विट केले आहे.

प्रत्यक्षात काय घडले आहे?

पण मुख्यमंत्र्यांनी खरंच एवढे विनोदी भाषण केले आहे का, याचा शोध मॅक्स महाराष्ट्रने घेतला, तेव्हा मुंबईत नुकत्याच झालेल्या संकल्प से सिद्धी तक या कार्यक्रमातील मुख्यमंत्र्यांचे ते भाषण असल्याचे सिद्ध झाले. पण मुख्यमंत्र्यांचे ते भाषण ५ ठिकाणी एडिट करुन हा १ मिनिटाचा व्हिडिओ तयार करण्यात आल्याचे दिसते आहे. निर्मला सीताराम असा उल्लेख त्यांनी केल्याचे दिसते आहे.

निष्कर्ष - एकूणच व्हायरल व्हिडिओमधील भाषण गंमतीशीर वाटत असले तरी प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी जास्त वेळ आणि अनेक मुद्द्यांवर भर देत भाषण केल्याचे फॅक्ट चेकमध्ये आढळले.

Similar News