पंतप्रधान खरंच फ्री लॅपटॉपचं वितरण करणार आहेत का?

Update: 2021-11-09 11:42 GMT

सध्या WhatsApp वर एक संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये पंतप्रधान फ्री लॅपटॉपचं वितरण करणार असल्याचं सांगितलं जात आहे. 2017 ला देखील असा दावा करणारा मेसेज व्हायरल करण्यात आला होता. या मेसेज समोर एक लिंक देखील देण्यात आली होती.

दरम्यान या व्हायरल होणाऱ्या मेसेज संदर्भात स्वत: PIB ने ट्वीट करुन माहिती दिली आहे.

प्रधानमंत्री फ्री लैपटॉप वितरण योजनेअंतर्गत सर्वांना मोफत लॅपटॉप दिले जात असल्याचा एक दावा #WhatsApp वर व्हायरल होत आहे.

#PIBFactCheck

अशा खोट्या माहितीपासून सावध राहा. तसंच या वेबसाईटला तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका असं या ट्वीट मध्य़े म्हटलं आहे.

निष्कर्ष:

प्रधानमंत्री फ्री लॅपटॉप वितरण या योजनेअंतर्गत कोणतेही मोफत लॅपटॉपचं वितरण केलं जाणार नसल्याचं PIB ने दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट होतं.

Tags:    

Similar News