Fact Check: ट्रेन सुरु झाल्यानंतर बोरीवली स्टेशन वर एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली का?

Update: 2021-02-05 16:23 GMT

1 फेब्रुवारीपासून मुंबईची लाईफलाइन असलेली लोकल कोरोना नंतरच्या लॉकडाऊन नंतर सर्व सामान्य लोकांसाठी सुरु झाली आहे. तीन टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबईच्या कोणत्याही रेल्वे लाइनवरून सुरू झालेली पहिली लोकल ते सकाळी 7 वाजेपर्यंत, दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत, रात्री 9 ते शेवटच्या लोकलपर्यंत, म्हणजे इतर वेळेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करू शकतात. असं महाराष्ट्र शासनाने काढलेल्या निर्देशात म्हटलं आहे.

मात्र, हे निर्देश आल्यानंतर ट्विटर यूजर जोशी जिन्दाजतक यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये बोरिवली स्टेशवरील गर्दी असं म्हणत ट्विट केलं आहे. हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे.


फ़ेसबुक यूज़र अनिरुद्धा बी चंदोरकर ने देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Full View

काय आहे सत्य?

जोशी जिन्दाजतक च्या ट्वीटवर सिनीयर DSC मुंबई, W.R. ने रिप्लाय दिला असून हा व्हिडीओ खोटा असल्याचं म्हटलं आहे. रेल्वे स्टेशनवर गर्दी कमी करण्यासाठी मुबलक मनुष्यबळ असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे.


Tags:    

Similar News