Fact Check: उत्तर प्रदेशमध्ये 34 मुस्लीम कुटुंबाने हिंदू धर्मात प्रवेश केला?

Update: 2021-12-24 11:44 GMT

उत्तर प्रदेशमध्ये शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी ६ डिसेंबर ला हिंदू धर्माचा स्वीकार केला. त्या दरम्यान अनेक सोशल मीडिया युजर्सनी एक फोटो शेअर करत एक नवीन दावा केला आहे. या फोटोमध्ये एक पुजारी मुस्लिम समाजातील लोकांनी वेढला आहे. हा फोटो शेअर करताना वसीम रिझवी यांच्या धर्मांतरानंतर उत्तर प्रदेशात ३४ मुस्लिम कुटुंबांनी हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा केला जात आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी हा दावा केला जात आहे.

उत्तरप्रदेशमधील ३४ मुस्लिम कुटूंब हिंदू धर्मात परतले. जय श्री राम सनातन हे एकमेव सत्य आहे.

अनेक फेसबूक वापरकर्त्यांनी भाजप आणि हिंदुत्व समर्थक गृपमध्ये पोस्ट केला आहे. – राष्ट्र हिंदू ने ही पोस्ट 'ऑन मोदी 2.0 (मोदी समर्थक कनेक्टेड)' [ज्याला 4,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. विजयभाई कळंबईकर यांनी हा दावा 'फिर एक बार योगी सरकार (या वेळी 350 पार)' आणि 'इंडिया नीड्स बीजेपी' त्रिलोक देवासी यांनी सुदर्शन न्यूज च्या ग्रृपमध्ये हा दावा पोस्ट केला आहे. त्याचप्रमाणे 'ब्रह्म राष्ट्र एकम' आणि 'जागो भारत जागो' या फेसबुक पेजवरही हा दावा पोस्ट करण्यात आला आहे.

सोशल मीडिया मॉनिटरिंग टूल CrowdTangle चा वापर करून, ही पोस्ट चेक केली असता, किमान 100 लोकांनी ही पोस्ट केली आहे.






 



 




 




 



 


ट्विटर यूजर @janardanspeaks आणि भाजप नेते अनुपेंद्र सिंह यांनी हाच दावा केला आहे.

काय आहे सत्य?




 


Google वर रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने ही इमेज सर्च केल्यानंतर, Alt News च्या रिपोर्टनुसार अमर उजालाने 2016 ला या संदर्भात वृत्त प्रसारीत केल्याटं आढळून आलं आहे.

https://www.amarujala.com/uttar-pradesh/mathura/muslim-speak-against-pakistan

या रिपोर्टनुसार, हा फोटो 23 सप्टेंबर 2016 चा आहे आणि तो मथुरा येथील जामा मशिदीत घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील उरी शहराजवळ भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला. याच्या निषेधार्थ मथुरेत पाकिस्तानविरोधात निदर्शने करण्यात आली होती. त्या रॅलीचा हा फोटो आहे. अमर उजालाने या निषेध मोर्चाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Alt News ने Google वर ३४ मुस्लिम कुटूंबांनी हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा सर्च केला असता, याची पुष्टी करणारू एकही बातमी मिळाली नाही.

निष्कर्ष:

सोशल मीडियावर ५ वर्षे जुना फोटो शेअर करत ३४ मुस्लिम कुटुंबांनी हिंदू धर्म स्वीकारल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे.

या संदर्भात Alt news ने रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे https://www.altnews.in/old-image-falsely-viral-as-34-muslim-families-convert-to-hinduism-in-up/


Tags:    

Similar News