नामांतर: मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्याचं स्मरण कशासाठी?

Update: 2023-01-14 12:23 GMT

सध्याच्या युगात थोर पुरुष आणि संतांची समाजनिहाय वाटणी सुरू झाली आहे. 'तुझा नेता थोर की माझा नेता थोर' या वादातून तरुणांना भडकवले जात आहे. त्यामुळे सद्सद्विवेकबुद्धी हरवून, जातीचा टिळा लावून माथेफिरूंसारखे हे तरुण वागतात. हा लढा लढला गेला. लढणारे लढले. मरणारे गेले. मात्र या लढ्याची झळ पोहोचलेली हजारो माणसं आजही जिवंत आहेत.त्यांनी जे भोगले त्यांच्या जाणिवा, त्यांचे दु:ख आजच्या पिढीपर्यंत किती झिरपत आले, हे सांगता येणार नाही.


कारण माणसांची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. 'ये तो चलतेही रहता है' अशी मानसिकता वाढत आहे. म्हणून नामांतरासारख्या लढ्याची ओळख नव्याने करून देण्याची गरज आहे. तरच इतिहास बिघडवणे वा बदलण्याचे मनसुबे उधळून टाकता येतील, शाहीर विलास घोगरेंनी लिहलेलं जळतोय मराठवाडा हे गीत खास MaxMaharashtra साठी सादर केलं आहे, शाहीर चरण वाघमारे यांनी....

Tags:    

Similar News