कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या जागेचा ताबा मिळवण्याबाबत सरकारचे दुर्लक्ष?

Update: 2020-12-31 04:22 GMT

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ शौर्याचे प्रतीक असून या ठिकाणी दरवर्षी हजारो आंबेडकरी अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. या ऐतिहासिक विजयस्तंभाचं जतन व्हावं यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. पण राज्य सरकार मात्र याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे, असा आरोप भीमा कोरेगाव संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या ऐतिहासिक विजयस्तंभाच्या जागेवर एका कुटुंबाने आपला हक्क सांगितला असून हा खटला सध्या हायकोर्टात सुरू आहे. पण जागेचा ताबा सरकारकडे राहावा यासाठी प्रयत्न होताना दिसत नसल्याचे संरक्षण समितीचे म्हणणे आहे. हायकोर्टात सरकारचे वकील येतच नाहीत आणि खटला चालवण्यासाठी पुढाकार घेत नाही असा आरोप समितीने केला आहे. यासंदर्भात सामाजिक न्यायमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण या विषयासाठी त्यांच्याकडे वेळच नाही असंही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.




Full View


Tags:    

Similar News