राजकारणी- पोलिसांच्या संगनमतानं कायदा सुव्यवस्था बिघडली: सुरेश खोपडे

राज्यातले चांगले पोलिस अधिकारी नंतर मात्र खंडणी वसुली साठी प्रयत्न करू लागले आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली राजकारण्याची जोड त्याला मिळाली, आता हे बदलण्यासाठी संपूर्ण पोलिस दलात रिफॉर्म करावं लागेल असे मत माजी पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी व्यक्त केलं आहे.

Update: 2021-03-22 16:26 GMT

मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांना दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते मुंबई पोलीस दलाला सचिन माझे प्रकरणामुळे काळिमा लागला असून ही हानी भरून न येणारी आहे असेही ते म्हणाले पोलीस दलामध्ये अनेक भ्रष्टाचारी अधिकारी असून त्यांच्यामुळे इतर प्रामाणिक अधिकारी वाहत जातात असे खोपडे यांनी सांगितले. परमवीर सिंग यांनी लिहिलेले पत्र किती खरं आहे याचा तपास करावा लागेल असं सांगून परमवीर सिंग यांच्या विरोधात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांनी लाच मागितल्याप्रकरणी आहे, हेही तपासावं लागेल असे सुरेश खोपडे म्हणाले.

Full View


Tags:    

Similar News