राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना केलेल्या विरोधानंतर सोशल मीडियावर मशिदींबाबत गंभीर आरोप करणाऱ्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आहेत. मशिदींच्या आत काय काय चालते, असा युक्तीवाद अनेक जण करत असतात.
पण सामान्य लोकांना राजकारण्याच्या या जाळ्यात न अडकता मुस्लिम समाजाच्या मशिदींमध्ये काय चालते, तिथे कशाप्रकारे प्रार्थना केली जाते, आणि मशिदींबाबत केला जाणारा अपप्रचार कसा चुकीचा आहे, हे दाखवून देण्यासाठी कल्याणमधील मुस्लिम बांधवांनी ९ एप्रिल रोजी हिंदू बांधवांना मशिदीमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. या पार्श्वभूमीवर मशिदींच्या आत काय चालते हे सांगणारा आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांचा एक्सक्लुझिव्ह ग्राऊंड रिपोर्ट....