शिवसेना-काँग्रेस दोस्तीमुळे कुणाला प्रॉब्लेम ?

Update: 2021-12-08 07:09 GMT

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर चर्चेचे वादळ उठलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर युपीए संपुष्टात येण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. युपीए संपवणं आणि काँग्रेसेतर पक्षांची आघाडी होणं या नविन राजकीय समिकरणाचे कर्तेधर्ते शरद पवार असल्याची चर्चा ही सुरू झाली होती. या चर्चेमुळे राज्याच्या महाविकास आघाडी सरकार वर काय परिणाम होतील अशा शंका-कुशंकांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत-राहुल गांधी यांची भेट महत्वाची मानली गेलीय.

भारतीय जनता पक्षाच्या ( BJP ) च्या कट्टर हिंदुत्वात्या अजेंड्याशी शिवसेना ( SHIV Sena ) च लढू शकते, त्यामुळे युपीए मध्ये शिवसेनेचा समावेश झाला तर काँग्रेसला भाजपाच्या हिंदुत्वाचा सामना करण्यासाठी सॉफ्ट हिंदुत्वाचा अवलंब करावा लागणार नाही, तसंच उत्तर प्रदेश मधील राम मंदिराचा अजेंडा ही कमजोर होऊन जाईल, त्यामुळे शिवसेना ही लोहे को लोहा काटता है या न्यायाने युपीए मध्ये महत्वाची भूमिका बजावू शकेल असं विश्लेषण मॅक्समहाराष्ट्र चे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर यांनी केले आहे. हे संपूर्ण विश्लेषण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

Full View

Tags:    

Similar News