T20 WC, Semi Final: भारतीय संघाचे सेमीफायनलचं तिकिट अफगाणिस्तानवर अवलंबून

Update: 2021-11-07 04:18 GMT

T20 WC, Semi Final: T20 विश्वचषक अखेरच्या टप्यात पोहचला आहे. कोणत्या संघाला सेमीफायनलचं तिकिट मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अ गटामधून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाला सेमीफायनलचं तिकिट मिळालं आहे. दक्षिण आफ्रिका संघाला 8 गुण मिळाल्यानंतरही उपांत्य पेरीत पोहचता आलेलं नाही. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघानं उत्तम नेट रनरेटच्या जोरावर उपांत्य फेरीत मजल मारली आहे. ब गटात पाकिस्तान संघ 8 गुणांसह उपांत्य फेरीत पोहचला आहे. मात्र, दुसऱ्या संघासाठी तीन संघ स्पर्धेत आहेत.

भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या तिन्ही संघांना उपांत्य फेरीत पोहचण्याची आशा आहे. सध्या न्यूझीलंड सहा गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारत आणि अफगाणिस्तान अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. आज, होणाऱ्या न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यानंतर ब गटातील उपांत्य फेरीत जाणाऱ्या संघाबाबत स्पष्टता येईल. भारतीय संघाचं उपांत्य फेरीच्या आशा न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यावर अवलंबून आहे. न्यूझीलंड संघानं जर अफगाणिस्तान संघाचा पराभव केला तर भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगणार आहे. जर असं झालं तर ब गटातून पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ पात्र ठरणार आहेत. मात्र, अफगाणिस्तान संघानं न्यूझीलंडचा पराभव केला तर मात्र, नेट रनरेटच्या आधारावर उपांत्या फेरीतील संघ ठरवला जाणार आहे. अशा परिस्थिती भारताला अखेरचा सामना मोठ्या फरकानं जिंकावा लागणार आहे. भारताचा अखेरचा सामना सोमवारी नामेबियाविरोधात होणार आहे.

Tags:    

Similar News