IPL-2024 News | इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमावर रोहित शर्मा नाराज...!

Update: 2024-04-18 12:04 GMT

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने टी-20 विश्वचषकासाठी मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्त्यांसोबत कोणत्याही प्रकारची बैठक न झाल्याचे सांगितले आहे. रोहितने प्रेरी फायर पॉडकास्टवर ऑस्ट्रेलियन दिग्गज ॲडम गिलख्रिस्ट आणि माजी इंग्लिश कर्णधार मायकेल वॉन यांच्यासोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमावर आपले मत व्यक्त करताना रोहितने दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या फलंदाजीचेही कौतुक केले.

दरम्यान, पॉडकास्टमध्ये माजी क्रिकेट खेळाडूंशी बोलताना रोहित म्हणाला की, 'मी कुणालाही भेटलो नाही. अजित आगरकर दुबईत कुठेतरी गोल्फ खेळत असतो, राहुल द्रविड बंगळुरूमध्ये आहे आणि आपल्या मुलाला खेळताना पाहत आहे. मी मुंबईत होतो. खरे सांगायचे तर आमची भेट झाली नाही. जोपर्यंत तुम्ही माझे ऐकत नाही, राहुल द्रविड, अजित किंवा बीसीसीआयमधील कोणीही कॅमेऱ्यासमोर येऊन बोलत नाही, तोपर्यंत सर्व काही चुकीचे आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमांविषयी काय म्हणाला रोहित?

रोहितने इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमावर नाराज नाराज असल्याची भूमिका व्यक्त केली आहे. पॉडकास्टमध्ये इम्पॅक्ट प्लेअरबद्दल विचारलेल्या प्रश्नावर तो म्हणाला की मी इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमाचा चाहता नाही. यामुळे अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी होईल आणि त्यांना रोखून धरले जाईल. क्रिकेट हा 12 खेळाडूंचा खेळ नसून 11 खेळाडूंचा खेळ आहे. इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू झाल्यामुळे शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर या अष्टपैलू खेळाडूंना संधी मिळत नाही. लोकांसाठी अधिक मनोरंजक बनवण्यासाठी तुम्ही गेममधून बरेच काही घेत आहात, असं रोहित शर्मा म्हणाला.

Tags:    

Similar News