'हा' खेळाडू होणार पंड्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार

Update: 2023-11-27 13:39 GMT

IPL 2024 : आयपीएल 2024 स्पर्धेसाठी 19 डिसेंबरला दुबईत(Dubai) लिलाव होणार असल्याची चर्चा आहे. पण यावेळी संघांनी ट्रान्सफर विंडो ओपन केली आहे. या अंतर्गत दोन फ्रेंचाइसी एकमेकांच्या सहमतीने आवडीचे खेळाडू एकमेकांना ट्रेड करू शकतात. या आंतर्गत मुंबईच्या (Mumbai)टीममध्ये हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) एंट्री झाली आहे. यासाठी मुंबई इडियन्स (Mumbai Indian) या संघाला १५ कोटी रूपये मोजावे लागले. ही बातमी सोशल मीडियावर चागंलीच व्हायरंल होतेय.

हार्दीक पांड्यांनंतर गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans ) कर्णधार कोण? हा प्रश्न सर्वच क्रिकेट प्रेमींना पडला होता. संघाचा कर्णधारच ट्रेडीगमध्ये गेल्याने गुजरात संघाने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. गुजरात संघाने नवीन कर्णधार म्हणून शुबमन गिल (Shubman gill) याची निवड केली आहे. हा एक तरूण भारतीय खेळाडू (Indian Player) म्हणून ओलखला जातो. त्याने गुजरात या संघासाठी २०२१ व २०२२ साली महत्त्वपूर्ण कामगिरी केलीय. २०२२ आयपीएलमध्ये तो ऑरेज कॅप विजेता आहे. 2018 साली शुबमनने के.के.आर. संघाकडून पदार्पण केलं होतं. आतापर्यंत 91 सामन्यांमध्ये त्याने 2790 धावा केल्या असून यामध्ये 3 शतके 18 अर्धशतके केली आहेत. मात्र, कोलकाता संघाने शुबमन गिलला रिलीज केलं होतं. त्यानंतर गुजरातने त्याला लिलावाआधी 8 कोटी रूपयांमध्ये खरेदी केलं.

Tags:    

Similar News