पाकिस्तानचा स्वप्नभंग ; ऑस्ट्रेलियानं फायनलमध्ये दिली धडक

Update: 2021-11-12 03:27 GMT

T-20 विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुसाट पाकिस्तानचा विजयीरथ रोखला. आणि अंतिम फेरीत धडक मारली. दुबईच्या मैदानावर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉइनिसने पाकिस्तानच्या विजयी घास हिरावत ऑस्ट्रेलियाला 5 गडी राखून विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

पाकिस्तानने कोणताही दबाव न घेता 20 षटकात 4 बाद 176 धावा केल्या. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची उत्तम सुरुवात केली, तर सूर गवसलेल्या फखर जमानच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियावर चांगली धावसंख्या उभी केली. रिझवानने 67 तर जमानने नाबाद 55 धावा केल्या . प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने फिंच, स्मिथ आणि मॅक्सवेलला स्वस्तात गमावले. पण डेव्हिड वॉर्नर, वेड आणि स्टॉइनिस यांनी झुंजार फलंदाजी करत 19 व्या षटकात विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया आता 14 नोव्हेंबरला विजेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडशी भिडणार आहे.

Tags:    

Similar News