T20 World Cup, IND vs AFG: तिसऱ्या सामन्यात Playing 11 मध्ये बदल होण्याची शक्यता

Update: 2021-11-03 04:03 GMT

मुंबई : T20 World Cup मधील पहिल्या दोन मॅचमध्ये टीम इंडियाची कामगिरी अतिशय सुमार झाली आहे. आज भारतीय संघ आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यात सामना होणार आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यानंतर प्लेईंग 11 मध्ये 2 बदल केले होते. आता बुधवारच्या मॅचमध्येही टीम इंडियात बदल होण्याची शक्यता आहे.

काल झालेल्या सरावाच्या दिवशी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्यात मोठी चर्चा झालेली दिसली. सूर्या पाठदुखीमुळे न्यूझीलंड विरुद्धचा सामनामध्ये खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी खेळवण्यात आलेला इशान किशन (Ishan Kishan) अपयशी ठरला होता. इशान फक्त 4 धावा काढून बाद झाला होता. सूर्यानं पहिल्या सामन्यामध्ये पाकिस्तानविरुद्ध 11 रन काढले होते.

टीम इंडियाचे फलंदाज पहिल्या दोन सामन्यात मध्ये फेल झाले. त्याचबरोबर गोलंदाजांनी देखील सुमार कामगिरी केली होती. 2 सामन्यात भारतीय गोलंदाजांना केवळ 2 विकेट्स घेता आल्या आहेत. त्या दोन्ही विकेट्स जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) घेतल्यात. मागच्या सामन्यात हार्दिक पांड्याचा सहावा बॉलर म्हणून वापर करण्यात आला होता. त्यानं 2 शटकात 17 रन दिले. मंगळवारच्या प्रॅक्टीस मॅचमध्ये रोहित शर्मानं (Rohit Sharma) बॉलिंगचा सराव केला. ऑफ स्पिनर रोहितनं आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेतली आहे. अफगाणिस्तान विरुद्ध 7 वा बॉलर म्हणून रोहितचा वापर केला जाऊ शकतो.

अफगाणिस्तानचा संघ ग्रुप 2 मध्ये 4 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना सेमी फायनलमध्ये जाण्याची संधी आहे. त्यांनी नामिबिया आणि स्कॉटलंडचा पराभव केला आहे. तर पाकिस्तान विरुद्ध त्यांचा निसटता पराभव झाला. टीम इंडियानं हा सामना गमावला तर त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आत्तापर्यंत T20 वर्ल्ड कपमध्ये 2 मॅच झाल्या असून या दोन्ही मॅच टीम इंडियानं जिंकल्या आहेत. 2010 साली 7 विकेट्सनं तर 2012 मध्ये 23 धावांनी टीम इंडियानं अफगाणिस्तानचा पराभव केला होता.

Tags:    

Similar News