T20 : उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी न्यूझीलंडला पराभूत करणं आवश्यक; टीम इंडिया सज्ज

Update: 2021-10-28 02:59 GMT

मुंबई  : T20 वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर भारतीय संघाला उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी न्यूझीलंडला पराभूत करणं आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय संघ कसून सराव करत आहे. भारत- पाकिस्तान सामन्यात हार्दिक पंड्याने गोलंदाजी केली नव्हती. हार्दिक पंड्याऐवजी इतर खेळाडूला संधी देण्याची मागणी जोर धरत असतानाच पंड्या नेटमध्ये घाम गाळताना दिसतोय.

पंड्याने टीम फिजिओ नितीन पटेल आणि सहाय्यक प्रशिक्षक सोहम देसाई यांच्या नेतृत्वाखाली सराव केला आहे. त्याने जवळपास 20 मिनिटे स्ट्रेचिंगपासून स्प्रिटिंगपर्यंत सराव केला आहे. तो नेटमध्ये जाऊन गोलंदाजीचा सराव करताना दिसला, सोबतच भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकुरने फलंदाजी केली. कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवि शास्त्री आणि मार्गदर्शक एमएस धोनीनं त्यांच्या खेळाची चाचपणी केली. हार्दिक पंड्या नेटमध्ये गोलंदाजी करत असल्याचं समोर येताच माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने "पंड्याने सामन्यात दोन षटकं जरी टाकली तरी संघाला फायदा होईल." असे म्हटले आहे. पाकिस्तान विरुद्ध पाच गोलंदाजांनी गोलंदाजी केली. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांची षटकं महागडी ठरली. मात्र, त्यानंतर देखील त्यांच्याकडून गोलंदाजी करावी लागली होती.

Tags:    

Similar News