पुण्यात पहिली राष्ट्रीय खो-खो स्पर्धा

Update: 2021-02-20 09:41 GMT

पुणे: कोरोना काळात सगळ्याच खेळांवर निर्बंध आले होते. पण आता खेळांना परवानगी देण्यात आल्यानंतर पुण्यामध्ये पहिल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सेवन ब्लॉक खो खो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

२० वर्षांखालील मुले आणि मुलींसाठी ही स्पर्धा आहे. शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे आणि २१ तारखेला या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. खो खो असोसिएशन ऑफ इंडियाच्या परवानगीने 7 ब्लॉक खो खो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि आधार सोशल ट्रस्ट, धायरी पुणे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत देशाभरातील 9 राज्यांच्या टीम सहभागी झाल्या आहेत.

Full View


Tags:    

Similar News