दिल्ली कॅपिटल्सने हैदराबादवर ८ विकेट्स केली मात

Update: 2021-09-23 02:18 GMT

सनरायजर्स हैदराबादनं दिलेलं १३६ धावांचं आव्हान दिल्ली कॅपिटल्सनं १३ चेंडू आणि ८ विकेट्स ठेवून गाठत दणदणीत विजय मिळवला. या विजयासह दिल्लीचा संघ पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन यानं ३७ चेंडूत ४२ धावांची खेळी केली, तर दुखापतीवर मात करुन संघात परत आलेल्या श्रेयस अय्यरनं नाबाद ४१ चेंडूत ४७ धावा केल्या आणि कर्णधार रिषभ पंत ३५ धावा करत नाबाद राहिला. 

तर हैदराबादकडून राशीद खान आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. खलील अहमदनं विकेट मिळवली असली तरी त्याच्या ४ षटकात दिल्लीच्या फलंदाजांनी ३३ धावा दिल्या.

तर दिल्लीच्या एन्रीच नॉर्खिया आणि कगिसो रबाडाने आपल्या वेगवान मारा करत हैदराबदाच्या फलंदाजांना धुव्वा उडवला. सोबतच अक्षर पटेलनं आपल्या फिरकीची जादू दाखवत २ विकेट घेतल्या हैदराबादनं सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. एन्रीच नॉर्खिया यानं सामन्याच्या पहिल्याच षटकात विस्फोटक डेव्हिड वॉर्नर याला शून्यावर बाद केले. हैदराबादकडून एकाही फलंदाजाला वैयक्तिक ३० धावा देखील करता आल्या नाहीत. अब्दुल समद यानं सर्वाधिक २८ धावा केल्या.

Tags:    

Similar News