विदर्भातील सत्ताधारी आहेत तर घोषणा नको कृती हवी : अंबादास दानवे

Update: 2022-12-29 08:41 GMT

हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या विकासासाठी चर्चा होत आहे .यावर विदर्भातील अनेक प्रश्न विधानपरिषद सभागृहाच्या पटलावर येतात .हिवाळी अधिवेशनाची सांगता होत आली असताना विदर्भाच्या विकाकासासाठी जोरदार चर्चा सभागृहात होताना दिसत आहे .

"विदर्भाच्या सर्वंकष विकासासाठी फक्त घोषणा नको तर कृती होण्याची गरज आहे, त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा व विदर्भावर सातत्याने होणारा अन्याय दूर करावा", असे स्पष्ट प्रतिपादन विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विदर्भातील अनुशेषावर भाषण करताना केले.

विदर्भ मराठवाड्याचा सातत्याने असणारा अनुशेष यावर चर्चा करत असतांना विदर्भाकडे होणारे दुर्लक्ष दूर व्हावे व विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरून निघावा अशी भूमिका दानवे यांनी मांडली.

बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआ सरकारने ८ हजार २५ कोटी रुपये दिले. त्यामुळे हा प्रकल्प एकट्या व्यक्तीने केला असं नाहीय हा प्रकल्प सरकारने पूर्ण केला आहे . समृद्धी महामार्ग हा राज्याच्या हिताचा प्रकल्प स्थगिती न देता राज्याने पुढे नेला.

अजूनही प्रकल्प पूर्ण झालेला नसताना टोल अधिक का घेतला जातो, असा प्रश्न त्यांनी विचारला.याचा फायदा विदर्भाला होणार असून विदर्भातील उत्पादनाची वाहतूक यामुळे जलद होईल.विदर्भात येणारे टाटा एअरबस, सफ्रॉन उद्योग हैद्राबाद व गुजरातला हलविले जातात याबाबत सरकारने विचार करण्याची गरज असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे .सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग एंटरप्राइजची गुंतवणूक ही विदर्भात कमी प्रमाणात आहे ,महाराष्ट्राचा विचार केला तर नागपूरमध्ये १८ हजार ७३७ , अमरावती ७६१३ हजार केवळ गुंतवणूक करून विदर्भावर अन्याय केला आहे.पण विदर्भात सरकारने इच्छाशक्ती व्यक्त केल्यास मोठे उद्योजक येतील.असं स्पष्ट मत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे .

Tags:    

Similar News