Sanjay Raut : शिंदे - फडणवीस सरकारचे हे शेवटचे बजेट - संजय राऊत

आज मुंबईमध्ये ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर चौफेर टिका केली. तसेच राज ठाकरे यांच्यावर सुद्धा तोंडसुख घेतले. त्याचप्रमाणे शिंदे-फडणवीस सरकारचे हे शेवटचे बजेट असल्याचे राऊत म्हणाले.

Update: 2023-03-10 06:57 GMT

आज ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे. ते पाहता राज्यातील बळीराजाला राज्य सरकारने तातडीने मदत मिळावी, यासाठी शिवसेना प्रत्येक तहसील कार्यालयावर जाऊन आंदोलन करत आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन, मदत जाहीर करा, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी राज्य सरकारला दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख ( Maharashtra Navnirman Seva) राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टिका करताना संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी सांगितले की, कुणी कुणाच्या वाटेला गेलं नाही. त्यांच्या वाटेला जाणे इतका त्यांचा पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात शिवसेना आघाडी सरकारचे मुख्यमंत्रीपद का गेलं हे संपूर्ण जगाला माहित आहे. त्यांना जर माहीत नसेल तर त्यांच्या पक्षाची अजून व्यवस्थित वाढ होणे गरजेचे असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. महाराष्ट्राचे सरकार हे फक्त ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आलं आणि जोडीला खोके, ईडी चा अनुभव हा त्यांनी चांगल्या प्रकारे घेतला असल्याची टिका राऊत यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर केली.

महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारनं आणि केंद्रातल्या सरकारने जात आणि धर्मावर राजकारण सुरू केले आहे. महाराष्ट्राची ही परंपरा नव्हती. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी तुम्ही जात दाखवाल, अशा प्रकारचा जात दाखवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असेल तर शेवटी महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला त्यांचा धर्म दाखवावा लागेल, असा टोला संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.

कसब्याच्या निकालात जनता कुठे गेली? हे सर्वांना दिसले आहे. नेत्यांचं काय घेऊन बसलात काल महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) बैठक झाली. सगळ्यांनी काही भूमिका आणि निर्णय ठरवले आहेत आणि ते असे आहेत की, कोणत्याही परिस्थितीत लोकसभा आणि विधानसभा या एकत्रित मजबुतीने लढायच्या आणि भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवायची, हे ठरले असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. तसेच चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी त्यांच्या पक्षाची अधोगती कशी चालली आहे यावर लक्ष द्यावं, असे राऊत यांनी बावनकुळे यांना सल्ला दिला.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल या भितीपोटी हे बजेट (Budget) सादर केले गेले असल्याची टिका राऊत यांनी यावेळी केली. कदाचित हे शिंदे-फडणवीस सरकारचं शेवटचं बजेट असेल. ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. आम्हाला सर्वांना खात्री आहे की, घटनेनुसार काम झालं. निर्णय लागला तर सुरुवातीचे १६ आमदार अपात्र ठरतील आणि त्यानंतर हे सरकार कोसळेल, अशी परिस्थिती आहे आणि हे सरकार कोसळल तर लोकांमध्ये जाण्यासाठी काही भूमिका हव्यात म्हणून हे बजेट (Budget) सादर केले असल्याचे राऊत यांनी सांगितले.

हा डरपोकपणा आहे आम्ही रोज सांगतो निवडणुका घ्या, विरोधी पक्ष कधीच सांगत नाही की, निवडणुका (Elections) घ्या आणि एकदा आमने-सामने होऊ द्या, शिवसेना कोणाची महाराष्ट्र कोणाचा हा फैसला होऊन जाऊ दे. असा थेट इशाराच संजय राऊत यांनी राज्य सरकारला दिला आहे. 

Tags:    

Similar News