'दाल मखनी आणि जिरा राईस', क्रांती रेडकरचा नवाब मलिक यांना टोला

Update: 2021-11-02 15:13 GMT

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यात गेल्या काही दिवसा सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या मालिकेने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे हे लाखो रुपयांचे कपडे, घड्याळ आणि बुट वापरतात असा आरोप केला आहे. पण आता नवाब मलिक यांच्या आरोपांना समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी उत्तर दिले आहे तेही ट्विटच्या माध्यमातून...क्रांती रेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे, " आमच्याकडे दुपारच्या जेवणासाठी डाळ मखनी आणि जिरा राईस केला होता. राईस घरीच बनवला होता आणि दाल मखनी बाहेरून मागवली होती, त्याची किंमत १९० रुपये होती. मी पुराव्यांसह मीडियाला ही माहिती देते आहे कारण उद्या कुणीतरी पत्रकार परिषद घेऊन सरकारी अधिकाऱ्याच्या घरी जे खाल्ले जायला नको ते खाल्ले गेले, असा आरोप करतील" असा टोलाही क्रांती रेडकर यांनी लगावला आहे.   

आर्यन खानला समीर वानखेडे यांनी ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटक केल्यानंतर समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. मलिक हे सध्या दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. सध्या समीर वानखेडे यांची विभागांतर्गत चौकशी सुरू आहे.

Tags:    

Similar News