बंडखोरांना पैसे आणि आणखी काही मिळाले: संजय राऊत

Update: 2022-07-05 14:25 GMT

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करत शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. “बंडखोर आमदारांना बंडासाठी केवळ पैसे मिळालेले नाहीत, तर त्यांना आणखीही काही मिळालंय. याबाबत ममता बॅनर्जी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय,” असं मत संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. सुरतमध्ये, गुवाहाटी, गोवा, मुंबईमध्ये हे आमदार ११ दिवस फिरत होते. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

Full View

rebel Sena Mla got money and more sanjay raut

Tags:    

Similar News