अमृता फडणवीस यांनी प्रश्न विचारताच राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला सल्ला

Raj Thackeray Advice to Devendra Fadnavis : अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राज ठाकरे यांना सल्ला विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना महत्वाचा सल्ला दिला आहे.

Update: 2023-04-27 05:04 GMT

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहेत. त्यापार्श्वभूमीवर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी लोकमतने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सल्ला विचारला. त्यावेळी राज ठाकरे यांनी अत्यंत महत्वाचा सल्ला दिला.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही काय सल्ला द्याल, असे विचारले. त्यावर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला देतांना म्हटले की, वर संबंध चांगले ठेवा.

राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. याचं महत्वाचं कारण म्हणजे, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फ़डणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. त्यामुळे सुरुवातीला देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यासंदर्भात खुलासा केला. मात्र देवेंद्र फडणवीस यांचे प्रोमोशन होण्याऐवजी डिमोशन का झाले? असा सवाल अनेकांना पडला होता. त्यामागे अमित शहा (Amit Shah) यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी वर संबंध चांगले ठेवा, असा सल्ला दिला असल्याची चर्चा रंगली आहे.

Tags:    

Similar News