सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोना काळात ४० लाख भारतीयांचा मृत्यू- राहूल गांधी

Update: 2022-04-17 10:03 GMT

२०२० मध्ये भारतात कोरोना (corona)आल्यापासून आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.सरकारी आकड्यानुसार भारतात सूमारे पाच लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पण कॉंग्रेस नेते (Rahul gandhi)राहूल गांधी यांनी केलेल्या दाव्यानुसार भारतात तब्बल ४० लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राहूल गांधींनी ट्विटरवर(Twitter) एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे.या ट्विटमध्ये कोरोनामुळे मृत्यूंची आकडेवारी जाहीर करण्यासाठी WHO च्या प्रयत्नांना रोखत आहे.असे म्हटले आहेत.

"नरेंद्र मोदीजी खरे बोलत नाहीत आणि इतरांना बोलू देत नाहीत, तरीही ते खोटे बोलतात की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणीही मरण पावलेले नाही, असंही राहुल गांधी म्हणाले. कोरोना काळात सरकारच्या दुर्लक्षामुळे पाच लाख नाही तर ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाला, असा मी याअगोदरही दावा केला होता. मोदीजी तुमची जबाबदारी पार पाडा - प्रत्येक (कोविड) पीडित कुटुंबाला प्रत्येकी ४ लाख रुपयांची भरपाई द्या, अशी मागणीही गांधी यांनी केली.

Tags:    

Similar News