साताऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक, शरद पवार साताऱ्यात

Update: 2021-11-24 04:51 GMT

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या निकालानंतर काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्याच कार्यालयावर दगडफेक केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात खासदार श्रीनिवास पाटील सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली.

त्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीबाबत शरद पवार यांनी माहिती घेतली असल्याचे ते म्हटले. तसेच पराभवाचा वचपा काढण्यासाठी सातारा आणि जावळी या ठिकाणी लक्ष केंद्रीत करणार असल्याचे शिंदे म्हणाले. सातारा नगरपालिकेची निवडणूक एक हाती जिंकणार असल्याचा विश्वास देखील आमदार शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने निसटता पराभव झाला, तर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली.

Full View


Tags:    

Similar News