आज निवडणूका झाल्या तर सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. पण तरीही आज निवडणूका झाल्या तर सर्वाधिक जागा या महाविकास आघाडीला मिळतील.

Update: 2022-08-12 03:33 GMT

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर त्याचा आगामी काळातील निवडणूकींवर काय परिणाम होईल? याविषयी वेगवेगळे आडाखे बांधण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच 2024 च्या निवडणूकीत कोणता पक्ष बाजी मारेल याविषयी अंदाज वर्तवण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान महाविकास आघाडी एकत्र लढल्यास भाजप आणि शिंदे गटाचं पानिपत होण्याची शक्यता सर्व्हेक्षणात दिसून आळी आहे.

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केल्याने शिवसेनेत फुट पडली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यापार्श्वभुमीवर आत्ता निवडणूका झाल्या तर सर्वाधिक जागा या महाविकास आघाडीला मिळतील. तसंच भाजप आणि शिंदे गटाला अवघ्या 18 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता सर्व्हेक्षणातून समोर आला आहे.

इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने केलेल्या सर्व्हेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात केलेले बंड आणि भाजपसोबत जाऊन स्थापन केलेली सत्ता लोकांना आवडली नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळेच आत्ता निवडणूका झाल्या तर आगामी काळात राज्यात युपीएला (काँग्रेस आणि राष्ट्रवादी)ला 30 जागा मिळतील. तर एकनाथ शिंदे आणि भाजपला अवघ्या 18 जागांवर समाधान मानावं लागेल, अशी शक्यता या सर्व्हेक्षणात वर्तवण्यात आली आहे.

2019 मध्ये भाजप आणि शिवसेना यांनी लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेचे 42 खासदार निवडून आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात भाजप आणि मित्रपक्षाचे 36 खासदार आहेत. तर उर्वरित खासदार हे उध्दव ठाकरे यांच्या गटासोबत आहेत. पण आज निवडणूका झाल्या तर भाजप आणि मित्रपक्षांच्या जागांमध्ये मोठी (24 जागा) ची घसरण होईल. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागांची संख्या 30 पर्यंत जाईल. मात्र भाजप आणि शिंदे गटाला अवघ्या 18 जागांवर समाधान मानावं लागेल.

इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने केलेल्या सर्व्हेनुसार भाजपच्या थेट 50 टक्के जागा घटणार आहेत. त्यामुळे हा भाजपसाठी धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी एकत्र लढल्यास त्याचा महाविकास आघाडीला मोठा फायदा होण्याची शक्यता सर्व्हेक्षणात वर्तवण्यात आली आहे.

Tags:    

Similar News