शिंदे गटात नाराजीची चर्चा, बंडखोर आमदार सुहास कांदे यांचे स्पष्टीकरण

Update: 2022-06-28 13:52 GMT

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फुट पडली आहे. शिवसैनिक बंडखोर आमदारांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. दरम्यान बंडखोर आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्याने राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यावरून राजकारण रंगले आहे. तर राज्यात बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गटातील 25 आमदार नाराज असल्याचे वृत्त समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यावर शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सुहास कांदे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत. माझ्या नांदगाव मतदारसंघातील विविध विकास योजना मार्गी लागल्या पाहिजेत यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. एकनाथजी शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही. याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्व शिवसैनिकांनी बळी पडू नये ही विनंती, असं स्पष्टीकरण सुहास कांदे यांनी दिले आहे.


Full View

Tags:    

Similar News