केतकी चितळेला लगेच अटक आणि दरेकर मात्र मोकाट का? 'आप'चा सवाल

Update: 2022-05-21 07:53 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका करणाऱ्या केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर विविध ठिकाणी गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. पण आता याच मुद्द्यावरुन आम आदमी पार्टीचे नेते धनंजय शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. केतकी चितळेवर लगेच कारवाई होते, पण मुंबै बँकेतील भ्रष्टाचार प्रकरणी प्रवीण दरेकर यांच्यावर सरकार कोणतीही कारवाई करत नाही, असा आरोप शिंदे यांनी केला आहे.

" केतकी चितळे प्रकरणात एकाच गुन्ह्यात अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होतात. कोर्टही लगेच पोलीस कोठडी देते. एका पोलीस ठाण्याची कोठडी संपली की लगेच दुसरे पोलीस ठाणे ताबा घेते. २०२० चे प्रकरणी पोलीस अॅक्टिव्ह होतात. मात्र २००० कोटींचा मुंबै बँकेत घोटाळा केलेला भाजपा नेता प्रवीण दरेकर रोज सरकारचे वाभाडे काढूनही मोकळा फिरतो. सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकार्याने पोलीस ठाण्यात तक्रार केली त्याला अडीच महिने होऊनही ना गुन्हा दाखल होतो ना अटक होते. EOW मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांचाही ठोस तपास होत नाही आणि भाजपा नेता प्रवीण दरेकरला अटकही होत नाही. बोगस मजुर म्हणून अपात्र केल्यावरही मजूर फेडरशनचे अध्यक्षपद भूषवतो व सहकार विभाग काहीच करत नाही. ज्या बोगस मजूर संस्थेचा म्हणजे प्रतिज्ञा मजूर संस्थेचा प्रवीण दरेकर मजूर सदस्य आहे त्या संस्थेला कोट्यवधींची कामे मिळतात, काय चाललंय राज्यात? कुठे घेऊन चालला आहात महाराष्ट्र माझा?"

असा सवाल उपस्थित करत शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे.

Similar News