अनिल देशमुख यांच्या याचिकेवरील निर्णयाची तारीख ठरली

Update: 2021-07-21 02:38 GMT

माजी गृहमंत्री अनिल देशमुख #AnilDeshmukhयांच्यावर 100 कोटी रुपये वसुली आणि पोलिसांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केल्याच्या आरोप कऱण्यात आला आहे. याच प्रकरणात CBIने#CBI FIR दाखल केला आहे. पण या FIRमध्ये अऩिल देशमुख यांच्याविरोधात जे काही आरोप करण्यात आले आहेत, त्याचा देशमुख यांनी आधीच इन्कार केला आहे. तसेच CBIने दाखल केलेला FIR रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अनिल देशमुख यांनी हायकोर्टात#BombayHighCourt दाखल केली होती. या याचिकेवरील सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. आता या याचिकेवरील निकाल हायकोर्ट गुरूवारी देणार आहे.

तर दुसरीकडे अऩिल देशमुख यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या FIRमधील काही मुद्दे वगळण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका राज्य सरकारने #MaharashtraGovernment दाखल केले आहे. या याचिकेवरील निर्णयसुद्धा कोर्टातर्फे गुरूवारी देण्यात येणार आहे. या दोन्ही याचिकांवरील निर्णय़ गुरुवारी दुपारी अडीच वाजता कोर्टातर्फे देण्यात येणार आहे.

अनिल देशमुख यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या FIRमधील 2 पॅरेग्राफ काढून टाकण्याची मागणी राज्य सरकारने आपल्या याचिकेत केली आहे. यामंध्ये सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय़ आणि त्याच्याकडे महत्त्वाच्या प्रकरणांची चौकशी सोपवण्याच्या निर्णयांची अऩिल देशमुख यांना माहिती होती, असा दावा करण्यात आला आहे. त्याला राज्य सरकारने आक्षेप घेतला आहे. तर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये अऩिल देशमुख यांनी पोलिसांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केला असा आरोप करण्यात आला आहे. त्यालाही राज्य सरकारने आक्षेप घेतला आहे.

परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात जे खोटे आरोप केले होते, ते आरोप तसेच्या तसे FIR मध्ये कॉपी आणि पेस्ट करण्यात आले आहेत, असा युक्तीवाद राज्य सरकारने केला होता. त्यामुळे या दोन्ही याचिकांवर हायकोर्ट काय निर्णय़ देते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags:    

Similar News