एकनाथ खडसे नंतर कन्या रोहिणी खडसे यांच्या अडचणीत वाढ, जिल्हा बँकेला ईडी ची नोटीस

Update: 2021-08-12 02:10 GMT

मुक्ताई साखर कारखान्याला कोट्यवधींचं कर्ज दिल्याप्रकरणी जळगाव मध्यवर्ती सहकारी बँकेला ED (सक्तवसुली संचालनालय) ने नोटीस दिली आहे. कर्ज दिल्याची सर्व माहिती तसेच कागदपत्र ED च्या कार्यालयात दाखल करण्याचे नोटीस जिल्हा बँकेला आज मिळाली आहे. विशेष म्हणजे ज्या मुक्ताई साखर कारखानाच्या व्हाईस चेअरमन पदी एकनाथ एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे ह्या आहेत. तर कर्ज देणाऱ्या जिल्हा बँकेच्या चेअरमन पदीही रोहिणी खडसे याच आहेत.

पुणे भोसरी MIDC भूखंड प्रकरणी ईडी मार्फत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची चौकशी सुरू आहे. ह्याच प्रकरणी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. तर खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची चौकशी सुरू आहे. त्यातच आता कन्या रोहिणी खडसे चेअरमन असलेल्या जिल्हा बँकने केलेल्या कोट्यवधींच्या कर्ज वाटपप्रकरणी ईडीने नोटीस धाडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्यातील 40 कारखान्यांना कोट्यवधींच्या नियमबाह्य कर्जवाटप प्रकरणी ईडीने काही जिल्हा बँकांना नोटीसा दिल्या आहेत. त्यात अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचा जरंडेस्वर कारखान्याचाही समावेश आहे.

मुक्ताई साखरकारखान्याला कोट्यवधींच कर्ज वाटप कोणत्या आधारावर तसेच नियमात दिलं. असा आरोप करत पत्रकार परिषदेत आरोप करत मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार आल्याचं म्हटलं होतं.

ईडीच पत्र आलं: कार्यकारी संचालक

ईडी चं पत्र जिल्हा बँकेला प्राप्त झाल्याचं जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितलं. कारखान्याला कर्ज वाटप केल्या प्रकरणाचे कागद पत्र देण्याचं पत्रात म्हटलं आहे.

Tags:    

Similar News