'भारी फेकतोस...', देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटवर कमेंटचा धुरळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर विरोधी पक्षांनी सडकून टीका केली. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत हसतानाचा फोटो ट्वीट केला आहे. त्यावर कमेंटचा अक्षरशः धुरळा उडाला आहे. नेमक्या आहेत कमेंट चला तर पाहुयात....

Update: 2023-01-21 01:53 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गुरुवारी मुंबई (Mumbai) दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी 38 हजार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde And Devendra Fadnavis) यांच्यासोबत मेट्रोने प्रवास केला. या प्रवासादरम्यानचा फोटो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट (Devendra Fadnavis Tweet) केला आहे. त्यावर कमेंटचा पाऊस पडताना पहायला मिळत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी, एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा हसतानाचा फोटो ट्वीट केला. त्यावर काय संभाषण सुरु असेल? याचा अंदाज लावा, असे म्हटले आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस चांगलेच ट्रोल झाले आहेत.

@shailendra489 यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटवर रिप्लाय देतांना म्हटले आहे की, लोकांनी विचार केला होता की, 'अच्छे दिन येतील' कदाचित तोच विचार करून हसत असतील, असा टोला लगावला.

भाजपशी संबंधित असलेल्या नितेश कुमार मोदी यांनी म्हटले आहे की, देशातील सगळ्यात मोठ्या जोकरच्या विषयावर हसत असतील.

अवनिश सिंह यांनी म्हटले आहे की, हम विश्वगुरु है, या डायलॉगवर हसत असतील.

अशोक शेखावत यांनी रिप्लाय करताना देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा संदर्भ देत मुड बना लिया की नहीं, असं म्हणून हसत असल्याचं म्हटलं आहे.

@prahappy या ट्विटर अकाऊंटवरून एक मिम्स ट्वीट केलं आहे. त्यात एकनाथ शिंदे म्हणत आहेत की, बारक्या म्हणायचा विधानसभेचा रस्ता वरळीतून जातो, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

@GaikwadRaju या ट्विटर अकाऊंटवरून प्रतिक्रीया देतांना म्हटलं आहे की, तु महाराष्ट्राचा फेकू मी देशाचा फेकू आपण मिळून सारा देश विकू, असं म्हणत असतील.

सोहन जाधव यांनी ट्वीटवर प्रतिक्रीया देतांना म्हटलं आहे की, भारी फेकतोस, माझ्या पेक्षा लांब लांब आणि तु 40 पुरणपोळ्या खातो वाटतो.

Tags:    

Similar News