जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकत भाजपची माघार

Update: 2021-11-09 11:18 GMT

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठ नवं वळण मिळालं आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ताकद पणाला लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपने नाट्यमयरित्या सर्व उमेदवारांचे अर्ज माघारी घेतले आहेत.जळगाव जिल्हा बँकेत 21 जागांसाठी निवडणूक होणार होती मात्र, भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने महाविकास आघाडीतील 11 उमेदवार बिनविरोध झाले आहे. आता 10 जागांसाठी मतदान होत असताना सर्वपक्षीय प्रस्थापितांनी विकास शेतकरी पॅनेलच्या माध्यमातून ही निवडणूक चुरश वाढवली आहे. एकनाथ खडसे यांनी पूर्ण पॅनेल आपल्या ताब्यात कसे राहील व चेअरमन पद आपल्याकडे कसे राहील यासाठी महाविकास आघाडीतील सोयीचे उमेदवार निवडले असल्याचा आरोप प्रस्थापित कार्यकर्त्यांनी केला आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय समविचारी व दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत विकास शेतकरी पॅनेलची स्थापना केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचं वर्चस्व जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्तानं दिसून आलं आहे.

भाजपने जिल्हा बँक निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने महाविकास आघाडीचा जिल्हा बँकेवर सत्तास्थापनेसाठी मार्ग मोकळा झाला असं वाटत असतानाचं महाविकास आघाडीच्या समोर आता शेतकरी पॅनेलचे आव्हान निर्माण झालं आहे.

Tags:    

Similar News