भाजप सत्ता स्थापनेचा दावा आजच करणार?

Update: 2022-06-30 02:41 GMT

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर भाजपच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. महाविकास आघाडी सरकार पडले असल्याने आता भाजपतर्फे सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल, असे सांगितले जाते आहे.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन आनंद साजरा केला. त्यानंतर त्याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी पुढील रणनीती गुरूवारी ठरवली जाईल, असे उपस्थित नेत्यांना सांगितले. त्यामुळे गुरूवारी भाजप नेत्यांच्या बैठकीत काय निर्णय होतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता भाजप शिंदे गटाच्या मदतीने सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले जाते आहे.

Full View

दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचे भवितव्य अजूनही अधांतरी असल्याचे सांगितले जाते आहे. त्यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईबाबत सुप्रीम कोर्टात ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामध्ये शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी, प्रतोद सुनिल प्रभू यांची कारवाई योग्य की अयोग्य याचा फैसला होणार आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने आपण शिवसेनेतच आहोत असे, कोणत्याही पक्षात विलिन होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

Tags:    

Similar News